घे भरारी..
काव्यरस
घे भरारी..
स्वप्नसुखांचे लेवुन पंख
घे भरारी गगनात
आभाळ आहे तुझेच परि
तु तुझिया मायेला विसरु नको
श्वासात घे भरुन तु
ती अविरत ऊर्जा त्या भानुची
घे भरारी गरुडापरि तु
असुदेत एक नजर भूवरी
नंदादीप तो जळत राहो
तुझ्या इच्छा-आकांक्षाचा
निसर्गाचे ते अनमोल देणे
तु परतवत रहा त्याला
- Dipti Bhagat
वाचने
2638
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
प्रत्येक वेळेस वाह.. भारी..
In reply to प्रत्येक वेळेस वाह.. भारी.. by गणेशा
थँक्स म्हणाव तर कमी पडेल.