बापजन्म!
काव्यरस
बापजन्म!
काल पाहिला मी एक
बाप जन्मताना
O.T. बाहेर
अस्वस्थ घुटमळताना
होणाऱ्या चिमुकल्या जिवासाठी
तिळ तिळ तुटताना
कोण म्हणतं
कि मातृत्वाच्या वेदना
फक्त आईलाच होतात
बापालाही होतच
असतात.. पण त्या
त्यालाच व्यक्त
करायच्या नसतात
लागताच पिलाच्या
येण्याची ती चाहुल
बापाचे डोळेसुद्धा
अश्रुमय होतात
पण जगाला खंबीर
आहे दाखविण्यासाठी
पापणीतच दडतात
आई-पिलु सुखरुप
आहेत; आता
एवढंच ऐकायला
त्याचे कान तरसतात
आणि डोळ्यांना वेध मात्र
त्या जिवाचे लागतात
पिलाला कुशीत घेताना
त्यालाही त्यांचा
नऊ मासांचा
तो प्रवास आठवतो
कोण रे होत लबाड
अस खोट खोट दटावुन
भाळावर अलगद
ओठ टेकवतौ
नंतर मी खंबीर आहे.
असं जणु
स्वतःलाच बजावत
"फोन आलाय"
बहाण्यान रुमबाहेर
जातो ; अन्
पापणीतला तो एक
उनाड अश्रु
त्याच्या नकळत
रुमालाने टिपतो!
(Dipti Bhagat)
वाचने
9266
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
पिलाला कुशीत घेताना
त्यालाही त्यांचा
नऊ मासांचा
तो प्रवास आठवतो
कोण रे होत लबाड
अस खोट खोट दटावुन
भाळावर अलगद
ओठ टेकवतौ
+1
छान लिहिलंय
आवडली कविता.
सं - दी - प
आवडली कविता.
धन्यवाद मंडळी! :)
दवणीय काव्य
एका वास्तवाचे सुन्दर सादरीकरण. आवडले.
कोंबडा, बबु प्रतिसादासाठी धन्यवाद!
वाचकांचे आभार! :)
सुंदर भाव
ही कविता वाचली आणि राहवले नाही म्हणून मुद्दाम प्रतिसाद देण्यासाठी लॉगइन केले. माझाही बापजन्म डोळ्यांसमोर तरळून गेला असाच.
फारच हृद्य! लिहीत राहा.
In reply to ही कविता वाचली आणि राहवले by एस
@एस,
तुम्हाला कविता रिलेट झाली.. बस्स! मला आणखी काय हवं? वाचत रहा.. :)
पुन्हा एकदा सर्व वाचकांचे मनपुर्वक आभार!
नंतर मी खंबीर आहे. असं जणु स्वतःलाच बजावत "फोन आलाय" बहाण्यान रुमबाहेर जातो ; अन् पापणीतला तो एक उनाड अश्रु त्याच्या नकळत रुमालाने टिपतो! (Dipti Bhagat)सुरेख!!!! कविता नक्की कोणाची आहे?
In reply to नंतर मी खंबीर आहे. by मनिष
प्रतिसादासाठी धन्यवाद!
इथे मन्या ऽ या आयडी ने वावरते. आणि माझ नाव दिप्ती भगत आहे. सदर कविता मीच लिहीलेली आहे.. परत एकदा धन्यवाद!
In reply to कविता माझीच आहे.. by मन्या ऽ
सॉरी.
मन्या ऽ या आयडीमुळे गोंधळ झाला :-)
पिलाला कुशीत घेताना