मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्राणवेळा

कौस्तुभ भोसले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आठवांच्या काळवेळा पाहिल्या. हृदयाच्या प्राणवेळा पाहिल्या. मालवेणा चंद्र भोळा कालचा. कालच्या या चांदण्याही राहिल्या. सोसली मी ही तमांची अंतरे. रात्र काळी झाडपाने मंतरे. गारव्याने जाग आली या फुला. पाकळ्यांच्या गंधपेशी दाहिल्या. प्राण झाले कातिलांचे सोबती. सांग हे का माणसाला शोभती ? वाचण्याचे मार्ग सारे संपले. शेवटाला प्रार्थना मी वाहिल्या. -कौस्तुभ वृत्त - मालीबाला

वाचने 4297 वाचनखूण प्रतिक्रिया 6

संजय क्षीरसागर 06/05/2020 - 12:25
छान अंदाज आहे लिहिण्याचा, फक्त शुद्ध लिहा. मालवेना चंद्र भोळा कालचा, कालच्या या चांदण्याही राहिल्या.

प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) 09/05/2020 - 08:39
आवडली

In reply to by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)

कौस्तुभ भोसले 11/05/2020 - 22:54
धन्यवाद