लेपाक्षी -हम्पी व परत ... भाग चौथा
भाग 1
भाग 2
भाग 3
भाग 3 वरून पुढे
सकाळी उठलो. आज तुन्गभद्रेच्या पलिकडे नावेने जायचे व स्कूटर भाड्याने घेऊन विरूपापुरागड्डी बेटाला भेट द्यायची ,सानापूर तलाव, जुना हम्प्पी व्हायडक्ट सारखा ब्रीज करीत ,हनुमान हळ्ळी , पम्पा सरोवर व अन्जनेय पर्वत असा भरगच्च बेत मनात आखला होता. नाश्ट्याला पुरी भाजी चा आस्वाद घेऊन मी १३ वर्शापूर्वी जिथे राहिले होतो त्या " अर्चना गेस्ट " हाउस च्या आन्टीना भेट दिली. त्यांची मुले मोठी होऊन मुलानीच आता गेस्ट हाउस वाढवले आहे. आता " फोरेनरचे होस्ट " हा त्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. मुलाशी बोलताना त्याने लांबलेल्या पावसामुळे बरीच बुकिंग रद्द झाल्याचे संगितले व नदीला अजूनही जरा जास्तच पाणी असल्याने पलिकडे हिप्पी आयलण्ड ला नेणारी नाव बंद आहे अशी सुवार्ता दिली. आता आजच्या दिवसाच्या प्लानचा तर फज्जा उडाला होता. मग रॉयल एनक्लेव्ह ओळखल्या जाणाऱ्या भागाचा दौरा करायचा म्हणून साडे आठशे रूपयात रिक्षा ठरवली. पहिला पडाव श्रीक्रुष्ण मंदिर .

श्रीक्रूष्ण मन्दीर,हम्पी
श्री कृष्ण मंदिराच्या प्रवेश्द्वारातील एक पॅनेल " प्रत्येक गोलात दशावतारातील एक"
श्री कृष्ण मंदिराच्या समोरील भाजी मार्केट ( त्यावेळचे ) . मधील एक कॉरिडॉर
हम्पी परिसरात उदंड सापडणारा प्राणी -खार -
श्रीक्रुष्ण मंदिराच्या शेजारीच हंपीची वेस आहे आपण हंपीत आलो याची खूण म्हणा हे द्वार आहे . यातूनच हंपीत प्रवेश घेण्यासाठी सर्व वाहने आत जातात. आता सरकारने हेमकूट टेकडीचा परिसर भिंतींचे कुंपण टाकून बंद केला आहे . कृष्ण मंदिराच्या मुख्य गोपुराचे दुरुस्ती व पुनर्ररचना काम चालू असल्याने त्या सेंटरिंगमुळे त्या गोपुराचा आनंद घेता येत नाही. पण द्वारावर भिंतीला काही शिल्पकाम आहे त्यात दशावताचा भाग आहे. आत हिरवे गार पोपट इकडून तिकडे उडताना दिसले. मंदिराच्या समोर खडड्यात मोठे पटांगण आहे . त्याचा दोन्ही बाजूने कॉरिडॉर आहेत .त्यावेळेचे ते भाजी मार्केट आहे. तिथे एका भित्री भागबाई खारीचा फोटो झूम असल्याने जमला.
उग्र नृसिंह मन्दिराचे प्रवेशद्वार
आमच्याकडे वर्णभेद वगरे अजिबात नाही ......
उग्र नृसिंह दर्शन
श्रीकृष्ण मंदिराचे नजीकच उग्र नृसिंह मंदिर आहे व त्याला लागूनच बडवीलिंग मंदिर आहे. चार बाजूंनी दगडी भिंतीने बंद फक्त एक बाजूने द्वार अशा चौकोनात उग्र नृसिंहाची खरेच उग्र भाव दाखवणारी मूर्त आहे. त्याच्या मागचे तो नागाचा फडा देखील तितकाच उग्र .
पुढचा पडाव....प्रसन्न विरूपाक्ष मन्दिर .. हे देऊळ जमीनीच्या खाली आहे . म्ह्णजे मन्दिर पहाण्यासाठी पायर्या उतरून जावे लागते. कालच पाउस पडल्याने मन्दिरात मंडपात पाणी साचले होते. गाभार्यात प्रवेश शक्यच नव्हता. पण मंडपातील खाबांची सुरेख प्रतिबिम्बे कॅमेर्याने टिपता आली.
हा फोटो काढताना मिपावरील दोन नटखट नटोरियस मित्रांची आठवण झालीच झाली !
सन्ग्रहालय
महानवमी डीब्बा याजवळील एक साधारण २० फूट उंचीचा अखंड दगडी दरवाजा
शाही सिक्रेट चेम्बर
"मी अमुक ठिकाणी थांबतो तुम्ही लोटस महाल , हत्तीखाना वगैरे रॉयल एन्क्लेव्ह चा भाग पाहून या ! असे रिक्षावाला म्हणाला तसे एक सर्वसमावेशक तिकीट काढून मी शाही विभागातून भटकू .लागलो हंपी भोवती त्याकाळी एक भव्य तटबंदी मधूनमधून टेहेळणी मनोरे असलेली अशी होती .शक्य असेल तिथे आता पुनर्र्चनेचे काम सुरू आहे.मनोरे काही प्रमाणात ढासळले असले तरी जे काही पाहायला उरले आहे ते ही देखणे आहे ! हत्तीखान्याजवळच एक संग्रहालय आहे. हत्तीखान्याच्या समोर हिरवळ उत्तम स्थितीत राहील याची काळजी घेतली आहे. लोटस महाल मध्ये मात्र त्याच्या जोत्यावर जाण्यास मनाई केली आहे .
हजार राम मन्दिराचा अन्तर्गत भाग
हजार राम मन्दिर विविध अंगानी दर्शन
हम्पी मधे आपण आल्यावर इथले दगड धोन्डे, नारळी केळी च्या बागा , भाताची शेते, मन्दिरे ,टेकड्या हे एकाच ठिकाणी पाहून आपण स्तिमित होतो.श्रीकृष्ण, अच्युतराया, विजय विठ्ठल व हजार राम या मन्दिराबरोबर विरूपाक्ष मन्दिर ही येथील अशी ठिकाणे आहेत की आपण कमी वेळात त्याना व आपल्या देखील न्याय देउ शकत नाही. मग किश्किन्धा, सानापूर ,हनुमानहळ्ळ्ली, अनिगुडी,कमलापूर सन्ग्रहालय ,तुन्गभद्रा धरण हे विषय आपल्या यादीतून निसटत जातात. जागोजागी एक मजली दोन मजली मन्डप आज विपन्नवस्थेत असले तरी अजूनही देखणे आहेत. पहायला आपली नजर हवी
हम्पी मधे काही वाद विवाद आहेत. येथील लोकामधे निरनिराळी हितसम्बन्ध गुंतलेले गट आहेत. रिक्शावाले बेसूमार झाले आहेत . त्याना बारा महिने धन्दा मिळत नाही. सबब मनाला वाटेल तो भाव . त्यान्चा स्कूटर ,मोटरसायकल भाड्याने देणार्याना विरोध आहे. सबब ती सोय नदीच्या अलीकडे नाही. गावातील काही लोकाना सरकारने पर्यायी घरे देऊन मुख्य देवळासमोरून हाकल्ले आहे. आता जी काही ५० घरे आहेत त्यानी दडपून दुसरा मजला चढवला आहे. अन्तर्गत रस्ते खराब आहेत. वर्षातून नोव्हेबर ते फेब्रूवारी एवढाच धन्दा असल्याने मग पदार्थ महाग विकावे लागतात असे एकाने सांगितले. इथल्या लोकाना ओला उबर ची काही माहिती नाही. मी रिक्शावाल्यांशी गप्पा मारल्या तर म्हणतात पुढे या धन्द्याचे काय होणार कुणास ठाउक . आता एस टी बस फक्त १३ रू त होस्पेटला नेते .अनेक विद्यार्थी इथून होस्पेटला कॉलेज साठी बसने जातात.
चक्रधर मंदिर आतून
चक्रध्रर मन्दिरात शिल्प काम असे काही नाही जवळ जवळ . पण तो एक वारसा आहेच सबब या मन्दिराची भिन्त जशी त्यावेळी होती तशीच बांधण्याचे काम चालू आहे.
रॉयल एन्क्लेव्ह मधेच महानवमी डिब्बा , पायर्या ची पुश्कर्णी व भुलभुलेया खोली ( रूम ) आहे. महनवमी डिबा म्हणजे मोठ्या महालाचे आता फक्त उरलेले भव्य उंच जोते आहे . इथे पर्यटकांची सेल्फी काढण्याची लगबग दिसत होती. मी मात्र एका खट्याळ फुलपाखराचा फोटो कसा काढता येईल ते पहात होतो.
इथेच जवळ एक वीसेक फूट उंचीच्या दगडी दरवाज्याचे एक दार जमीनीवर विसावले आहे. हे सर्व पहात पुन्हा रिशावाल्याला गाठले. व पुढचा प्रवास सुरू केला.
जवळच क्वीन्स बाथ ची इमारत होती .मागेच आलो असताना ही व्यवस्थित पाहिलेली होती त्यामुळे रिक्शावाल्याला थेट रिक्षा चंद्रशेखर मंदिरापाशी घ्यायला साँगितली. मंदिराचे सध्या दुरूस्तीचे काम चालू आहे. खास करून मंदिराची सीमाभिंत पूर्वीसारखी करण्याचे प्रयत्न चालू असलेले दिसत होते. या मंदिरात खूप काही असे कलाकाम मला दिसले नाही. आतून एक चक्कर मारून काही फोटो काढले व बहेर पडलो. जवळच अष्टकोनी विहीर आहे. बांधकाम अप्रतिम आहे. इथे काही विद्यार्थी अभ्यास करायला आलेले दिसले.
एव्हाना रिक्शावाला चुलबूळ करायला लागला होता. एकतर त्याला घरी जायचे असावे किंवा दुसरे गिर्हाईक मिळते का हे बघावयाचे असावे. मीही बराच दमलेला होतो ,मग त्याला रिक्शा परत हम्पीत बस अड्ड्यावर घ्यायला सांगितले. दुसरा दिवस संपला. आजच्या दिवसात स्कूटर भाड्याने घेऊन हिप्पी आयलंड , अनेगुडी ,सानापूर अशी मनसोक्त रपेट करण्याचे मनसुबे पावसामुळे फसले होते.
क्रमशः
वाचने
17538
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
सुंदर.
In reply to सुंदर. by कंजूस
तिथं सायकल भाड्याने घेणे
In reply to तिथं सायकल भाड्याने घेणे by प्रचेतस
सायकल ?
In reply to सायकल ? by चौकटराजा
तिथं चढाव, दगडांमुळे शक्यच
हा भागही मस्त झाला. हंपीवर मी
छान...
In reply to छान... by किल्लेदार
किष्किन्धा..
In reply to किष्किन्धा.. by चौकटराजा
हंपी म्हणजे पंपाक्षेत्र. पंपा
In reply to छान... by किल्लेदार
हंपी ला परत जायची इच्छा मनात
In reply to हंपी ला परत जायची इच्छा मनात by कंजूस
बाप रे
In reply to हंपी ला परत जायची इच्छा मनात by कंजूस
याच भागात .....
In reply to याच भागात ..... by चौकटराजा
गदग नव्हे होस्पेटे
In reply to गदग नव्हे होस्पेटे by चौकटराजा
रात्री आठला ट्रेन पोहोचते
In reply to याच भागात ..... by चौकटराजा
नकाशा
विकिपेडिया
In reply to विकिपेडिया by चौकटराजा
म्हणजे तुंगभद्रेपलीकडला प्रदेश
___/\__
खुप माहितीपुर्ण व वाचनीय
अप्रतिम फोटो प्रचि. आणि
सहलप्रवर्तक वर्णन!
खूप सुंदर! काही अपडेट्स देत आहे
@चौकटराजा. माफ करा .आपल्या धाग्यावर थोडी ढवळाढवळ करण्याबद्दल
थाळी आवाज विडिओ छान!
उपयुक्त माहिती गोरगावलेकर +१