मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हो मनुजा उदार तू ..

मनोज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
निसर्गाने सूक्ष्म हे दैत्य असे सोडले अहंकारी माणसा गर्व सारे तोडले धूर हा हवेत रोज नदीत जहर सांडले प्रतिशोध हा असेल तुला घरात कोंडले उपसलेस बहुत तेल गिरी अनेक फोडले सजेल ही धरा पुन्हा तव हस्तक्षेप खोडले विकास नाव देऊनी वृक्ष अमाप छाटले दुःख ते अपार किती वसुंधरेस वाटले ? मोडलेस घर त्यांचे नांगर थेट फिरवले झुंजलेत पशु त्यांना हिंसक तूच ठरविले शिक आता दिला धडा जरा तरी सुधार तू देई स्वार्थ सोडुनी हो मनुजा उदार तू

वाचने 2668 वाचनखूण प्रतिक्रिया 2

चांदणे संदीप 01/05/2020 - 13:34
आशयसंपन्न कविता! सं - दी - प