गुढी उभारावी अशी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
गुढी उभारावी अशी
एक उभी केली काठी
त्य़ाला बांधली गोड गाठी
निंबाचा उघळा वर तांब्याची लोटी
दर वर्षी आपण अशी पारंपारीक गुढी उभारतो
पण थोर पुरुषांनी अशा अमर गुढ्या उभारल्या
भक्तीची गुढी तुकारामांनी
ज्ञानाची गुढी ज्ञानेश्वरांनी
गिता संदेशाची गुढी कृष्णांनी
शांतीची गुढी बुध्दांनी
महाराष्ट्राची गुढी शिवरायांनी
समतेची गुढी ज्योतिबांनी
सत्य अहिंसेची गुढी गांधीनी
देश भक्तीची गुढी सावरकर, भगतसिंगांनी
स्वच्छतेची गुढी गाडगेबाबांनी
शिक्षणाची गुढी कर्मवीर अण्णांनी
मला वाटते मोठे काम करणे
म्हणजेच गुढी उभारणे होय
आपण सुध्दा अशीच गुढी उभारुन
नव्या म-हाट मोळ्या वर्षाची सुरवात करु या.
माइया तर्फ सर्व बंधु भगीनींना नव वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा
वाचने
2217
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
कवितेतील संदेश आवडला
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
In reply to कवितेतील by अमोल केळकर
कवितेतील संदेश आवडला.
In reply to असेच म्हणतो by सहज
छानच!!
सहमत आहे!!
मोठे काम करणे म्हणजे गुढी उभारणे.........खासच संदेश!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
सुंदर कविता..
आपला,
(भगतसिंगचा भक्त) तात्या.
कवितेतील