इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल!
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा
नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा
का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!
काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा
भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा
दारात ती उभी अन्, नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो, उंबरा असावा
माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही'
दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा
- इलाही जमादार
वाचने
45575
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वाह! क्या बात है!
क्या बात है!
वा वा
In reply to वा वा by धोंडोपंत
धोंड्या,
वा!
या
In reply to या by आवशीचो घोव्
ही घ्या!
इलाही जमादार
मस्तच
In reply to मस्तच by आनंद
आनंदराव,
सहजच मिपा चाळत असताना ही
खूपच छान गझल
वाचलेली ऐकलेली माणसे गेली