निरोप
लेखनविषय:
कसा आज मोगरीने डाव साधला
सुन्न ओझे आठवांचे घाव घातला..
सुटे भान दिशाहिन आज जाहलो
सापडेना मार्ग माझा चांद मातला..
हरवले माझे पण तुला पाहता
आसवांनी दोर माझा आज कापला..
संपले ते स्वप्न सारे सत्य जाणता
भुतकाळ रम्य सारा आज बाटला..
हंसलीस खिन्न सखे ओठ दाबुनी
आसवांना लपविता भाव दाटला..
एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी
अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..!
विशाल
वाचने
1914
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी
अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..!
मस्तच :)
सुरेख कविता!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
मस्त विशाल्.सुंदर.
क्या बात है विशाल... सुरेख!!!!
शेवट अतिशय नाजूकपणे साधला आहेस..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आवडली कविता.
-अनामिक
"एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी
अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..!"
क्या बात है !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी
अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..!
ओहो, क्या बात है !
विशाल येऊ दे रे अजून अशाच सुंदर कविता !
In reply to सुंदर कविता by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो....
शेवट मस्तच साधलास रे....
सुंदर कविता