अज्ञाताचा गड चढताना
अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी आली
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतिस्तव बसली
उठून गड बेलाग लांघण्या कंबर कसुनी उठली
निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढली
जिथे संपली वाट त्या तिथे काहीतरी लखलखले
त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडले
वाचने
2518
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
चांगली कविता.... आवडलीच
Sandy,
जिथे संपली वाट त्या तिथे
वा!