मला भेटलेले रुग्ण - २०
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !!
हा मुळापासून हादरला होता ....
मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं .... शेवटी हे सांगीतलं की तुझ्यापेक्षा जास्त शक्यता तर मला आहे कारण मी रोज एखादा टिबीचा रुग्ण बघतो किंवा निदान करून उपचार सुरू करतो , माझी प्रतिकारशक्ती मी अशीच मेंटेन केलेली आहे !!
ह्या सगळ्या संभाषणाला परवा वर्ष झालं हे दादा सांगत होता आणि थॅंक्स म्हणाला तेव्हा जाणवलं की डॉक्टर म्हणून मी यशस्वी का आहे :)
_________________________________
डॉक्टर थॅंक्स ......
ओपिडी संपत आली होती तेव्हा ही मुलगी आणि तिची आई भेटायला आल्या .....ती म्हणाली की डॉक्टर ॲलर्जीची ट्रिटमेंट पूर्ण झालीये , तिन वर्षांपुर्वी असलेला त्रास नाहीसा झाला ; आज तुम्हाला फक्त थॅंक्स म्हणायला आलो !!
माझ्या डोळ्यासमोरून मागची तिन वर्ष झरकन तरळून गेली आणि खूपच आनंद झाला की आपण एखाद्याचा आयुष्यात एवढं स्थान मिळवू शकलो ..... You made my day मी त्यांना एवढंच म्हणू शकलो ....
_________________________________
ओपिडी संपत आली होती , हे ७५ वर्षांचे गृहस्थ आणि त्यांचे दोन मुलं सेकंड ओपिनीयसाठी आले आणि आल्या आल्या माझ्याकडे दाखवल्याची जुनी फाईल दाखवत काही नव्या फाईल्स व रिपोर्टस् दाखवून म्हणाले , डाॅक्टर उद्या पेट स्कॅन करायचा आहे कारण आमच्या फॅमिली डॉक्टरांना कॅन्सरची शक्यता वाटते आहे . त्या आवाजातली मुर्तिमंत भिती आजही मला स्पष्ट आठवते आहे, मी ऐकून घेतलं आणि सगळे रिपोर्टस् आणि एक्सरे बघून झाल्यावर फक्त एकच तपासणी करायला सांगितली व त्यानंतर पेट स्कॅन करा एवढंच सांगीतलं....
दोन दिवसांनी रिपोर्ट आल्यावर त्यांना अभिनंदन केलं आणि म्हणालो ‘काका हा तर टिबी आहे , तुम्ही पूर्ण बरे व्हाल काहीही काळजी करू नका !’
सहा महिन्यांनी टिबीचा कोर्स पूर्ण झाल्यावर परत अभिनंदन केलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू काय सांगत होते हे मी शब्दात मांडूच शकणार नाही ...
_________________________________
‘हर दिन नमाज के वक्त डाक्टर साब हम आपके लिए दुऑं मांगते है ‘ ..... हे फॉलोअपला आलेल्या रुग्णाच्या बायकोनी म्हटल्यावर मला भरून आलं ...
मी फक्त दम्याचं निदान करून उपचार चालू केले होते ......
_________________________________
वाचने
10462
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
रुग्णाच्या जीवनातील तुमचे स्थान फार वरचे आहे
सुंदर... नेहमी प्रमाणेच
सुंदर लेख डॉक्टर !!!
डाॅक्टर - पेशंट हे नातं
जुने रुग्ण आवर्जून तुम्हाला
मलाही म्हणायचं प्रत्येक डॉक्टरला म्हणायचं आहे. थँक्स डॉक्टर!!
तुम्ही लोक राव तुम्ही लोक
तुमच्या डॉक्टर मित्राला आमचा
नेहमी प्रमाणे मस्त (च)
वा!
In reply to वा! by चौकटराजा
डीफ्रेंशियल!
नेहमीप्रमाणेच हृदयस्पर्शी..