तू (अर्थात त्याच्या नजरेतून ती...)
लेखनविषय:
तू परत येणार नाहीस हे
मला केव्हाच कळलं आहे
माझं वेड मन मात्र अजून
तसं तुझ्यातच गुंतलं आहे
माझाच मूर्खपणा होता तो
सारं काही गृहीत धरलं मी
डोळे मिटून अंधा~या रात्री
झणी शिडात वारं भरलं मी
कसा दोष तसा देऊ तुला मी
तुझं तसं काहीच चुकलं नाही
पण मी तरी सांग काय करू
पापण्यांवरचं पाणी सुकलं नाही
कशीही होवो तशी माझी अवस्था
तुझंच भलं असेल मनात माझ्या
हसेन इथे मी लपवून आसवाना
जखमा असतील जरी मनात ताज्या
जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू
फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा
पडतील जिथे जिथे पाउले तुझी,
असू दे हळूवार मखमलि गालीचा
वाचने
3412
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
म्हणजे कवीच्या मनातली लय समजेल, आणि आस्वादाचा आनंद वाढेल.
जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू
फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा
पडतील जिथे जिथे पाउले तुझी,
असू दे हळूवार मखमलि गालीचा
या ओळी छान आहेत.
- प्राजु
कविता ठिक वाटली.
याच शीर्षक मात्र खूप आवडलं (अर्थात त्याच्या नजरेतून ती...)
हा अर्थात फार महत्वाचा वाटतो :) या "अर्थात" मुळे बर्याच दिवसांपासून पडलेले प्रश्न पुन्हा आठवले.
- अश्या कविता मुलंच का लिहितात?
- मुलींच प्रेम कधी असफल होतच नाहि का?
- का मुलिंचा प्रेमभंग होतो तेव्हा दुसरा तिच्या आयुष्यात आलेलाच असतो? (नवरा म्हणून का असेना) त्यामुळे त्यांना अशा कविता करत बसायला वेळच मिळत नाहि (किंवा वेळच येत नाहि)
- का अश्या भावना मुली चार चौघात मांडत नाहित?
कशीही होवो तशी माझी अवस्था
तुझंच भलं असेल मनात माझ्या
हसेन इथे मी लपवून आसवाना
जखमा असतील जरी मनात ताज्या
क्या बात है...!
जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू
फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा
पडतील जिथे जिथे पाउले तुझी,
असू दे हळूवार मखमलि गालीचा
वा सतिश! अगदी हृदयाला हात घातलास रे!
जियो..!
तात्या.
ध्वनिमुद्रित करून श्रवणासाठी दुवा द्यावा