Skip to main content

कोजागिरी

लेखक मायमराठी यांनी रविवार, 13/10/2019 या दिवशी प्रकाशित केले.
आतुरली यामिनी ही उमलुनी पाकळ्यांना मातलेल्या चांदण्याही योजती बाहुपाशांना ।।१।। गोडी जणु अमृताची प्रसवे नभातुनी या जोडी झुरे चातकांची प्राशण्या ती शुभ्रमाया ।।२।। अपूर्णता साहवेना शश शोभे शशीदेहीं काया छायेत मावेना पूर्णता ये तिथीलाही ।।३।। पौर्णिमेचा चांद भोळा मनामनां मोहणारा लाजताना तोळातोळा कोजागिरी लुटणारा ।।४।।
लेखनविषय:

वाचने 2093
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

वा वा .. मस्त लिहिले आहे आतुरली यामिनी ही उमलुनी पाकळ्यांना मातलेल्या चांदण्याही योजती बाहुपाशांना

पौर्णिमेचा चांद भोळा मनामनां मोहणारा लाजताना तोळातोळा कोजागिरी लुटणारा ।।४।।
क्या बात!! सुंदर