मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खंत

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बोलली नाहीस कधी न सांगताच पण काही मज उमजली होती सखे तगमग अलवार तूझी मिटल्यास पापण्या तू पण रुद्ध डोळ्यांमधली मज जाणवली होती आतुरता व्याकुळ तूझी मिटलेल्या ओष्ठकळ्या कबुलणार नाहीस तू सखे ओळखली होती मुग्ध हळवी प्रीत तूझी वृंदावन डोळ्यांमधले तू गं राधा कृष्णमयी गोकुळात विरघली होती मुक नि:शब्द वेदना तूझी विषप्याला अमृत झाला श्यामखुळी तू वेडी मीरा कृष्णात मिसळली होती स्निग्ध शांत चेतना तूझी मज कळली नाही कशी खुण आपल्या नात्याची सखे मीच हरवली होती धुंद ओढाळ मुरली माझी विशाल

वाचने 1364 वाचनखूण प्रतिक्रिया 4

अवलिया Tue, 03/24/2009 - 18:11
मज कळली नाही कशी खुण आपल्या नात्याची सखे मीच हरवली होती धुंद ओढाळ मुरली माझी
+१ आवडली. --अवलिया