शब्द
लेखनविषय:
काव्यरस
शब्द निरर्थाचे भोई
शब्द अर्थभार वाही
शब्द धूसर सावली
शब्द दाहक बिजली
शब्द कोरडा व्यापार
शब्द अस्तित्वाचे सार
शब्द व्योमापार शिडी
शब्द गहनडोही बुडी
शब्द अटळ कुंपण
शब्दापार मुक्तांगण
वाचने
4096
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
शब्द निरर्थाचे भोई
शब्दापार मुक्तांगण
एवढ्या दोनच ओळी लिहिल्या असत्या तरी देखिल ती कविता आवडली असती.
पैजारबुवा,
आवडली.
खूप छान
कविता आवडली
कविता आवडली.
-दिलीप बिरुटे
काव्य.
आवडले
नाखु
शब्द अर्थाचे लाचार,
शब्द सर्वस्वाचा स्वाहाकार
शब्द स्वतःचाच नव्याने स्वीकार ।
__/\__
आडली कविता.
देणार्या कविता रसिकांचे आभार.
मस्त...आवडली