सागराचे मनोगत
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
घेउनिया माझ्या शिंपल्यातील मोती
खुलविता सौंदर्य तुम्ही शरीरावरती
मग मला काहो कुरूप करीता ?
माझ्या भोवती कचरा पसरवूनी !
नेतो मी तुम्हा पैलतिरांवरी
झेलून तुमचा भार खांद्यावरी
मला का तुम्ही अडकवीता ?
घालुन बांध माझ्या भोवताली !
माझ्यातील जीव मारूनी
तुमचे तुम्ही पोट भागवती
माझ्या साठी काय हो देता ?
घाण आणि प्रदुषणा वाचूनी !
माझ्यातून तुम्ही तेल शोषूनी
उद्योग तुम्ही भले उभारती
अतिरेकी मज स्पर्शुन जाती
तुम्ही कुठे करीता माझी रखवाली ?
वाळू चे माझ्या ढिग उपसती
लुटता माझे अवयव तुम्ही
सोशितो तुमचे सगळे छळ
नारळी पुनवेच्या एका श्रीफळावरती.
वाचने
6273
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
शेवट भन्नाट!
खूप सुंदर
अरे खरच की...
धन्यवाद.