एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :(
प्रतिक्रिया
In reply to 'जनमत घेऊन कायमचं ठरवा' हे by कंजूस
In reply to 'जनमत घेऊन कायमचं ठरवा' हे by कंजूस
In reply to शोभा डे हि एक श्रीमंतीचा माज by सुबोध खरे
In reply to "Dear Amit Shah, by सुबोध खरे
In reply to देशाच्या गृह मंत्र्यांना by प्रकाश घाटपांडे
In reply to होय, इंग्रजीतही 'एकेरी' असे असते by रविकिरण फडके
In reply to "Dear Amit Shah, by सुबोध खरे
In reply to शोभा डे हि एक श्रीमंतीचा माज by सुबोध खरे
शोभा डे हि एक श्रीमंतीचा माज असलेली दक्षिण मुंबईतील आढ्यताखोर स्त्री आहे.
डाव्या विचारसरणीची आणी श्रीमंतीचा माज ?
शोभा डे यांचा आणि डाय्वा विचारसरणीचा संबंध तुम्हास कुठे आढळला ? म्हणजे किमान त्यांचे एखादे तरी स्टेटमेंट एखादा तरी लेख एखादे तरी पुस्तक एखादी का होइना मुलाखत ज्यातुन कळते की शोभा डे या डाव्या विचारसरणीच्या आहेत वा त्याच्या समर्थक आहेत हे तुम्ही दाखवाल तर कळेल तरी इतकी नवी बाब जनतेला
की शोभा डे या डाव्या विचारसरणीच्या आहेत.
कारण आजपर्यंत जी माहीती आहे त्यांच्य्याविषयी ती पुर्णपणे वेगळीच आहे.
शोभा डे या मुंबईच्या एकुण उच्च नव्हे तर अति उच्च वर्तुळात कायम वावरत असलेल्या आहेत त्यांच्या अनेक लेखांतुन दक्षिण मुंबई विषयीचा तिच्या श्रीमंती विषयीचे कौतुक त्यांच्या लिखाणात वारंवार आढळते. त्या मुंबईच्या अतीउच्च सोशलाईट वर्गातील पार्टीज मध्ये बॉलिवुड इ. मध्ये पेज थ्री पर्स्ननॅलीटीज इ. त नेहमी दिसुन येतात तशी त्यांची उघड उघड ओळख आहे. अप्रत्यक्षपणे त्या मुंबईच्या उच्चतम कॅपिटलीस्ट क्लास च्या प्रतिनीधी च जणू असल्यासारख्या वाटतात
या विरोधात जर त्या डाव्या विचारसरणीच्या असतील ( तुमच्या म्हणण्याप्रमाणे ) तर हे फारच रोचक प्रकरण असेल
कृपया द्या ना एखादी त्यांच्या संबंधातील डावी लिंक
किमान एखादा लेख
किमान एखादे स्टेटमेंट
शोभा डे ही निर्भिडपणे कुणालाही बोलू शकते, मत नोंदवते. खरेच ?!
आपल्या बेजबादार आणि बेताल वक्तव्यांमुळे जर आपल्यावर कारवाई झाली तर आपल्या जातकुळीचे लोक आपल्या पाठीशी उभे राहून गदारोळ माजवतील. अर्थातच कायदेशीर कारवाई होणार नाही, अशी खात्री असल्यावर असे बोलणे याला 'निर्भिडपणा' नाही तर 'क्षुद्र बनेलपणा' म्हणता येईल.
अनेक वर्षांपूर्वी एक-दोन वादग्रस्त पुस्तके लिहून ही बाई प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तथाकथित सिक्युलर विचारजंतांच्या कळपात सामील झाली. गेली अनेक वर्षे, अनेक सलग महिने, ती माध्यमांतील प्रसिद्धीबाहेर असते, कारण तिच्याकडे बोलण्याजोगे फारसे काही महत्वाचे नसते. पण, प्रसिद्धीचा हव्यास असल्याने, ती मधून मधून उगाच विचित्रे वादग्रस्त विधाने करून टुकार माध्यमांत दोन मिनिटांची प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते. 'सैन्य गोळी मारणार नाही याची खात्री असल्यावर दगफेक करणारे' आणि 'अश्या व्यक्ती' यांच्यात अर्थाअर्थी काहीच फरक नाही. :)
"घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् | येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत् || (पक्षी : मडकी फोडा, कपडे फाडा, गाढवावर बसून (गावभर) हिंडा, काही करा पण प्रसिद्धी मिळवा)" किंवा "making one's presence felt by nuisance" ही वचन अश्या बनेल लोकांना चपखल बसतात.In reply to शोभा डे ही निर्भिडपणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शोभा डे ही निर्भिडपणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शोभा डे यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. by मारवा
In reply to शोभा डे यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. by मारवा
In reply to एका मुलाखतीत शिवसेनेलाही परखड by कंजूस
पुन्हा ती योग्य का अयोग्य हे ठरवणार कोण? खरेच ?!
शोभा डे ला जसे हवे ते बोलण्याचा अधिकार मानला जातोय, पण, इतरांना तिच्या बोलण्यातला खरे-खोटेपणा आणि/किंवा चलाखी आणि/किंवा ढोंग उघड करण्याचा अधिकार नाही का ???!!!
अश्या मानसिकतेमुळेच, "तथाकथित भारतिय विचारवंत, फक्त आम्हालाच बुद्धीचे आंदण मिळाले आहे, आम्ही म्हणू तेच खरे आणि इतर कोणालाही आमच्यावर टीका करण्याचा (किंवा आमचे पितळ उघडे पाडण्याचा) अधिकार नाही" असा अहंकार बाळगून आहेत.
भारतात लोकशाही आहे, तथाकथित विचारवंतांची हुकुमशाही नव्हे, असे माझे मत आहे. अर्थातच, कोणत्याही दाव्याचा प्रतिवाद करण्याचा हक्क सर्वांनाच आहे. ज्याला तेच तथाकथित विचारवंत "विचारस्वातंत्र्य" म्हणतात आणि ज्याच्या नावाने ते सतत गळे काढत असतात, तोच हा हक्क आहे. तो हक्क इतर सर्व भारतियांनाही आहे.
तेव्हा, जिला स्वतःची बुद्धी आहे व तिचा वापर करून पुरावे व तर्क यांच्या बळावर तथाकथित विचारवंतांच्या बोलण्यातला फोलपणा समजू शकते, त्या प्रत्येक व्यक्तीलाही आपले विरोधी मत नोंदविण्याचा अधिकार आहे.
पूर्वीही, तथाकथित विचारवंतांच्या चलाखीने किंवा प्रोपागँडाने सगळ्याचे डोळे त्यांच्या दिपून जात नसत. तेव्हाही, थोडीशी बुद्धी असलेल्या आणि ती वापरणार्यांना, त्यांच्या बोलणे-लिहिणे-मतांतील खोटेपणा-चलाखी-फोलपणा सहज लक्षात येत असे. परंतु, तथाकथित विचारवंतांनी कंपू करून सर्व माध्यमे हातात ठेवली होती व आपल्याविरोधी मत असल्याचा संशयही असलेल्यांच्या मतांची ते गळचेपी करत असत... त्यांची प्रसिद्धी होऊ देत नसत. हल्ली, आंतरजालावरची अनेक माध्यमे सर्वसामान्यांसाठी खुली आहेत. त्यामुळे, कोणाच्याही मतांतील सहज दिसणार्या ढोंगावर आणि/अथवा चलाखीवर इतर लोक सहजपणे टीका करू शकतात... अर्थातच, तथाकथित विचारवंतांचे मातीचे पाय सतत उघडे पदत आहेत. त्यामुळे, लोकांची दिशाभूल करून स्वतःची तुंबडी भरण्याची त्यांची दुकाने बंद झाली आहेत. हल्ली जास्तच दिसणार्या, तथाकथित विचारवंतांच्या, जळजळीचे हेच मुख्य कारण आहे.In reply to टीका करावी by Rajesh188
In reply to अजून एक राहिले !!! by ट्रम्प
In reply to भारतात जयचंद आणि मिर जाफरांची by डॉ सुहास म्हात्रे
'जनमत घेऊन कायमचं ठरवा' हे