मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सरसर सरसर आली सर

बिपीन सुरेश सांगळे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सरसर सरसर आली सर ------------------------------------ सरसर सरसर आली सर सरसर सरसर आली सर सरसर सरसर आली सर भरभर भरभर छत्री धर धरू कशी ? सुटलाय वारा छत्री उलटी झाली तर ? सरसर सरसर आली सर लवकर रेनकोट अंगावर घालू कसा ? घालूनही जर आतून सगळा भिजलो तर ? सरसर सरसर आली सर छत्री नको रेनकोट नको धाराच झेलू अंगभर पाऊस होऊ क्षणभर सरसर सरसर आली सर ---------------------------- बिपीन

वाचने 3679 वाचनखूण प्रतिक्रिया 8

पाषाणभेद 03/08/2019 - 00:40
जीओ बिपीन "पाऊस होऊ क्षणभर" यामुळे मेलो तुमच्या कवितेवर!!!!

बिपीन सुरेश सांगळे 03/08/2019 - 15:26
जीओ बिपीन "पाऊस होऊ क्षणभर" यामुळे मेलो तुमच्या कवितेवर!!!! मस्त प्रतिक्रिया . पण पाषाणभेद संकोच वाटतो , एवढी मोठी प्रतिक्रिया मिळाल्यावर . ( ती ओळ मला स्वतःलाही आवडली आहे .)

बिपीन सुरेश सांगळे 03/08/2019 - 15:28
पाषाणभेद रेनकोटला मला योग्य मराठी प्रतिशब्द सापडला नाही कोणाला माहिती आहे ? कोणी सुचवू शकेल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 04/08/2019 - 11:33
आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे