Skip to main content

वारी

लेखक मायमराठी यांनी गुरुवार, 01/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
त्यागाने धजलेले, भक्तीत चूर, देह हे सजलेले । धुळीने नटलेले, समर्पणां आतुर पाय हे वळलेले । नामाने माखलेले, वारीचे काहूर हृदयीं ह्या उठलेले । मातीने रंगलेले, भजनांचे सूर नभीं या दंगलेले । माऊलीने भारलेले, भक्तांचे ऊर कीर्तनीं या न्हालेले । पंथ भिजलेले, भक्तीने महामुर, जीव हे चिंबओले । ध्यास ल्यालेले, जरी क्षणभंगुर आयुष्य विठुरायांत मुरलेले । - अभिजीत
लेखनविषय:

वाचने 2976
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया


ध्यास ल्यालेले, जरी क्षणभंगुर आयुष्य विठुरायांत मुरलेले ।
वारी थेट उतरली. -दिलीप बिरुटे