वारंवार लिहावी लागणारी वाक्ये

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
24 Jul 2019 - 9:18 pm

*Texpand App*

बर्‍याच वेळा आपल्याला तीच तीच वाक्ये वारंवार वापरावी लागतात.दरवेळी टंकायचा कंटाळा येतो.अशावेळी ही वारंवार टायपावी लागणारी वाक्ये कोणीतरी टाईप करुन दिली तर?
अशी सोय असणारी ही छोटीशी अॅप.

१. या अॅपला इतर अॅपवर वापरण्यास परवानगी द्या.

२. वारंवार वापराव्या लागणार्‍या वाक्याचा शॉर्टकट बनवून सोबतच त्याचं विस्तारवाक्य साठवून ठेवा.

आता जेव्हा जेव्हा हा शॉर्टकट फोनवर कुठेही टाईप कराल त्यावेळी या अॅपचा सेवक लगेच हजर होईल.त्यावर टॅप करताच ते पूर्ण वाक्य टाईपलं जाईल.समजा ते नको असेल तर तिथेच Undo ची पण सोय आहे.ही Offline अॅप आहे.म्हणजे यासाठी इंटरनेटही सुरु असायला लागत नाही.

*अॅपची लिंक*

https://play.google.com/store/apps/details?id=com.isaiasmatewos.texpand

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

24 Jul 2019 - 10:38 pm | जालिम लोशन

ट्राय करतो.

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2019 - 8:40 pm | धर्मराजमुटके

अ‍ॅप ची कल्पना छान आहे पण अगोदरच स्मार्ट फोन मुळे लोकांचे टायपिंग कमी झाले आहे. एक दिवस लोक शब्दाचे संपूर्ण स्पेलींग ही विसरतील की काय असे मला वाटायला लागले आहे. त्यामुळे होता होईल तोवर मराठीची तरी टंकनाची सवय कायम ठेवावी. शुद्धलेखन सुधारण्यासाठी नियमित टंकनाने मदत होईल. मात्र मराठीची ऐशी ची तैशी करणार्‍यांनी नक्कीच या अ‍ॅपचा उपयोग करुन चुका टाळाव्यात.

जेम्स वांड's picture

27 Jul 2019 - 9:06 pm | जेम्स वांड

त्यापेक्षा एक पॅकेट ए४ कागद आणून रोज एका बाजूने (एका कागदावर दोन दिवस निघतील) मनात येतील ते उस्फुर्त विचार मांडले तर शुद्धलेखन पण उत्तम होईल अन सुलेखन सुद्धा, एक पॅकेट कागद १८०-२२०₹ ला मिळेल त्यात ५०० पाने म्हणजे २२० रुपये अधिक पेनाचे पैसे बघता किफायतशीर रित्या शुद्ध अन सु अशी दोन्ही लेखने होतील.

मराठी कथालेखक's picture

26 Jul 2019 - 4:50 pm | मराठी कथालेखक

android मध्ये text shortcuts हा पर्याय उपलब्ध आहे (कोणत्याही इतर अ‍ॅपची गरज नाही). मी माझ्या घराचा पत्ता, इमेल पत्ता आणि इतर काही महत्वाच्या गोष्टी ज्या वारंवार एखाद्याला पाठवाव्या लागतात त्यांचे text shortcuts करुन ठेवले आहे ते सहज वापरता येते.

इरामयी's picture

31 Jul 2019 - 8:38 pm | इरामयी

हे करून पाहिलं. शॉर्टकट्स दाखल करता आले पण ते वापरायचे कसे ते काही कळत नाही.

सोन्या बागलाणकर's picture

15 Aug 2019 - 4:40 am | सोन्या बागलाणकर

जेव्हा तुम्ही शॉर्टकट टाईप कराल तेव्हा सजेशनमध्ये ज्या शब्दाचा शॉर्टकट केला आहे तो दिसेल.
उदा. तुम्ही "मिसळपाव.कॉम" साठी "मिपा" असा शॉर्टकट केला असेल तर तुम्ही मिपा टाईपल्यावर वरती "मिसळपाव.कॉम" असे सजेशन दिसेल त्यावर टिचकी मारा.

हा का ना का :)

सोन्या बागलाणकर's picture

15 Aug 2019 - 4:47 am | सोन्या बागलाणकर

अर्थात तुमचा कीबोर्ड कुठला आहे यावर ते अवलंबून आहे. हि सुविधा फक्त गूगल कीबोर्डमध्ये चालते. उदा. sony xperia मध्ये xperia कीबोर्डच चालतो त्यात ही सुविधा नाही. तुमचा फोन जर प्युर अँड्रॉइड असेल (उदा. मोटो जी), तर ही सुविधा चालेल.

मराठी कथालेखक's picture

15 Aug 2019 - 9:14 pm | मराठी कथालेखक

माफ करा मी आपला प्रतिसाद बघितला नव्हता त्यामुळे उत्तर दिले नाही. खाली 'सोन्या' यांनी विस्ताराने लिहिले आहेच. तरी काही अडचण वाटल्यास व्यनि करा.

चौथा कोनाडा's picture

29 Jul 2019 - 9:18 am | चौथा कोनाडा

आदिआजा !

मराठी कथालेखक's picture

16 Aug 2019 - 8:04 pm | मराठी कथालेखक

तुम्ही अँड्रॉइडचा व्हॉईस रेकग्निशन वापरला आहे का ?
ते छान आहे मराठी किंवा इंग्लिश मध्ये देखील वापरू शकता उदाहरणादाखल मी आत्ता हा प्रतिसाद अँड्रॉइड वोईस रेकॉग्निशन वापरून देत आहे आणि मला यात कोणतीही सुधारणा करावी लागली नाही फक्त विरामचिन्हे मात्र स्वतः टाकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2019 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दांचा संग्रह व्हायला पाहिजे होता असे वाटले. तरीही माहितीबद्दल आभारी आहे.

-दिलीप बिरुटे