खाजगी मंदिरे की उर्मटपणा चे अड्डे?
लेखनप्रकार
नमस्कार मित्र मैत्रिणींनो .अतिशय मोठ्या कालखंडानंतर मिपावर लिहीत आहे. सर्व कसे आहात? कंकाका यांचेशी मी अधून मधून संपर्कात असतो. मिपावर फोटो चिकटवणे ही खूप किचकट प्रक्रिया आहे म्हणून थोडा कंटाळा करत होतो.या लेखात फोटो असण्याची गरज नाही हा भाग वेगळा. फोटोसाठी काही युक्त्या कंकाका यांनी सांगितलेल्या आहेत त्या करून पाहतो.असो ....आता लेखाच्या विषयाकडे वळूया.
खाजगी मंदिरे हा एक अतिशय भयानक प्रकार अलीकडेच पुण्यात पाहिला. ही घटना आठवली की पुणेकर म्हणून मान शरमेनं खाली जाते
एका दत्त संप्रदायातील साधू महाराजांच्या समाधी मंदिरात मी सहा महिन्यापूर्वी गेलो होतो.मंदीर बाहेरून अतिशय सुंदर दिसत होते व कळसावर सुंदर कलाकुसर होती. अर्थात या मंदिराची माहिती मिळाल्यामुळे कुतूहल म्हणून गेलो. मंदिराचा दरवाजा बंद असून आतून कडी लावली होती. बराच वेळ टकटक केल्यावर एक पुजारी वजा व्यवस्थापनाचा कर्मचारी बाहेर आला आणि त्याने माझी बरीच चौकशी केली. जणू काही मी व्हिसा मुलाखतीला आलो काय असे मला वाटले . नंतर पाय धुवा म्हणून त्यानें सांगितलें मी तसे केल्यानंतर तो सतत माझ्याबरोबर पाळत ठेवन मंदिरापर्यंत आला व दर्शन झाल्यावर "चला आता" असे उर्मटपणें मोठ्या आवाजात म्हणाला. खरे तर त्या शांत वातावरणात मला थोडे वेळ एकांतात बसायचे होते पण ते काही शक्य झाले नाही. मला असे वाटले की मी पॅरोल वर रजा घेतलेला कैदी असून रजेच्या शेवटच्या दिवशी दर्शनाला आलोय. त्याच्याशी थोडे बोलण्याचे धाडस मी केले व या मंदिरात दरवर्षी कोणते उत्सव असतात याची चौकशी केली. त्याने उपकार केल्यासारखे काही उत्सवांची माहिती दिली मग मी या उत्सवाची माहिती बाहेर कळवली जाते का ते विचारल्यावर त्याने नकारार्थी मान हलवली व हे उत्सव फक्त प्रतिष्ठित निमंत्रित लोकांसाठी असतात असे सांगितले. मला परत मी एक कैदी असल्याचां भास झाला. एकदाचा तो उर्मट पाहुणचार घेऊन मी बाहेर पडू लागलो पण बाहेर पडताना त्याला सांगितले की तुम्ही भक्तांवर इतका अविश्वास दाखवून त्यांचा अपमान करता हे बरे नाही. त्याने ऐकून न ऐकल्या सारखे केले.
काही झाले तरी मला त्या मंदिरातला शांतपणा आवडला होता म्हणून परवा सहज परत त्या मंदिरात गेलो व तोच घटनाक्रम परत सुरू ! त्याच कर्मचाऱ्यांनी पहिल्या वेळीच येताय का असे विचारल्यावर मी न बोलता दोन बोटे दाखवून दुसऱ्यांदा असे सांगितले. त्या माणसाला माझा चेहेरा ओळखीचा वाटला आणि तो तिथेच बसला ...... हुश्श! पण मी गडबडीत असलेने पाय धुवायचे चुकून विसरलो आणि आत जाऊ लागलो तर आतील ३ स्वच्छता कर्मचारी माझ्या पुढून व
मागच्या वेळचे हवालदार (?) आणि इतर कर्मचारी
मागून पिसाळलेल्या कुत्र्यासारखे " ओ कुठ चालला ?" असे ओरडले.जणू मी त्यांचा खजिना लुटायला चाललो होतो. मी त्यांना म्हणले हळू बोला हे मंदीर आहे. त्यांनी माझा आणखी अपमान केला व जोरजोरात पाय धुवून जायचे असते असे सुनावले .
माझे पुढील ऐकून न घेता आणखी दोन व्यवस्थापक आले व हमरी तुमरी करून तुला जोड्यानी मारतो किंवा तुला फेकून देतो अशी भाषा करू लागले. हे खाजगी मंदीर आहे आणि आम्हाला तू कोण सांगणार असे ओरडू लागले. नंत्तर अक्षरशः त्यांनी मला हाकलून दिले.
किती हा उर्मटपणा?
या घटनेने एक पुणेकर म्हणून माझी मान शरमेनं खाली गेली आहे.
मी त्या स्थानाचा उल्लेख मुद्दाम टाळतो आहे कारण मला वैयक्तिक चिखलफेक करायची नाही पण देव त्यांना भक्तांशी नम्रपणे वागायची सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो.
असे आहे हे खाजगी मंदीर प्रकरण!
.
वाचने
19586
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
ऐतिहासिक मंदिरे
गुप्तता कशासाठी?
In reply to गुप्तता कशासाठी? by सामान्यनागरिक
हे खासगी मंदिर असल्याने
In reply to हे खासगी मंदिर असल्याने by सुबोध खरे
कदाचित अधीक अपमान होण्यामुळे
मी लगेचच बाहेर निघालो. चार
दर्शनासाठी भाविकांनी आत यावे
एका दत्त संप्रदायातील साधू
मी
In reply to मी by नाखु
जिथे गर्दी आणि माज, बडेजाव
जिथे गर्दी आणि माज, बडेजाव असतो तिथे सात्विकता मला तरी अनुभवायला मिळाली नाही.+१०० उलट अश्या जागी तथाकथित स्वयंसेवक आणि रक्षकांची मुजोरी चालू असते... आणि त्यांची ती सवय (विशेषतः, दर्शनाला आलेल्या लोकांना पुढे ढकलणे) गर्दी नसली तरी, कायम असते. ही सवय सेवेची नसून, गर्दीवर सत्ता गाजवण्याच्या उन्मादाची असते. अशा जागी पावित्र्याची, निर्मळ आनंदाची आणि मनःशांतीची अनुभूती कशी येऊ शकेल ? नावाजलेल्या देवस्थानांत एकदोनदा त्या प्रकारच्या उन्मादी माणसांचा अनुभव आल्यानंतर, मी नावाजलेल्या आणि/किंवा गर्दी असलेल्या देवस्थानांत जाणे बंद केले आहे.In reply to जिथे गर्दी आणि माज, बडेजाव by डॉ सुहास म्हात्रे
तुमचा हा प्रतिसाद वाचून
In reply to तुमचा हा प्रतिसाद वाचून by संगणकनंद
त्या देवस्थानातील 'सेवकांच्या
.
In reply to . by वकील साहेब
शेगाव.... जाहिरात आहे....भेटलो की बोलू...
अक्कलकोट मस्त
In reply to अक्कलकोट मस्त by Rajesh188
अक्कलकोट....जाहीरात आहे....
कुठेतरी वाचलेले एक वाक्य
In reply to कुठेतरी वाचलेले एक वाक्य by राघव
मस्त ...
In reply to मस्त ... by मुक्त विहारि
+1, काका मी तर हे फार आधीपासून लक्षात ठेवले आहे
इतके पण खाजगी नाही ते
तुमचा त्रागा
मंदिर कुठलं
In reply to मंदिर कुठलं by झेन
किसी रईस की महफिल का जिक्र ही
खासगी
In reply to खासगी by कपिलमुनी
ज्जे बात
In reply to खासगी by कपिलमुनी
मस्तच की
खर तर मला एक कळत नाही कि
सर्वांना प्रतिक्रियांबद्दल
In reply to सर्वांना प्रतिक्रियांबद्दल by शान्तिप्रिय
नाही महाराज ते देऊळ आहे, देव्हारा न्हवे
अंबरनाथमधले साई सेक्शन हे
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥
स्वतःच्या भक्तांना असं
In reply to स्वतःच्या भक्तांना असं by नगरीनिरंजन
समाधान, फार मोठे आणि सात्विक समाधान
In reply to समाधान, फार मोठे आणि सात्विक समाधान by जॉनविक्क
आणि जे देवाच्या नादि लागत नाहीत ते
In reply to आणि जे देवाच्या नादि लागत नाहीत ते by जॉनविक्क
काय बोलणार?
In reply to काय बोलणार? by मुक्त विहारि
हा हा हा
In reply to हा हा हा by जॉनविक्क
कसला शैतान?
In reply to कसला शैतान? by मुक्त विहारि
हा हा हा
In reply to हा हा हा by जॉनविक्क
हे प्रकरण काय आहे?
In reply to हे प्रकरण काय आहे? by मुक्त विहारि
अभ्यासाला जरा उशीर केलाय असे वाटत नाही का ?
तरीही
In reply to तरीही by नाखु
काय करणार गाववाले?
खासगी मंदिरे म्हणजे काय हा एक
हे वाचून मी एकदा उत्तर
खाजगी मंदिरात जायची गरजच काय?
जगातील सगळे धर्म हे जुनाट
In reply to जगातील सगळे धर्म हे जुनाट by विजुभाऊ
किंचित असहमत (दुसर्या ओळीसाठी
In reply to किंचित असहमत (दुसर्या ओळीसाठी by उपेक्षित
तुळशीबाग
In reply to जगातील सगळे धर्म हे जुनाट by विजुभाऊ
किंचित सहमत
In reply to जगातील सगळे धर्म हे जुनाट by विजुभाऊ
जगातील सगळे धर्म हे जुनाट
भक्ताने