झटपट पराठा
..तर, पराठे बनवायची लहर आली होती पण जास्त पसारा करायची तयारी नव्हती. झटपट काय करता येईल ह्याचा अंदाज घ्यायला पाककृती पुस्तकं, जमवलेल्या रेश्प्या वगैरे पाहून झाल्या पण सोपं पण मस्त असं पटकन् आवडून जाईल,
असं काही सापडलं नाही. नेहमीचा साधा पराठा तर नको होता.
काय करावं, काय करावं हा विचार करत आंतरजालावर धांडोळा घेताना ही एक मस्त चटपटीत आणि पटकन् करता येईल अशी पराठ्याची कृती सापडली आणि बनवलेले पराठे घरी आवडले, म्हणून इथे पण सगळ्यांसाठी लिहूया, म्हटलं.
पाककृती आणि फोटो - आंतरजालावरून साभार. आमच्यात स्वयंपाक बनवतात आणि मग डायरेक्ट खातात, मध्ये फोटो गिटो काढत बसायला वेळ नसतो, पण मिपावर फोटो नसतील पाककृती फाऊल असा एक ( वाईट्ट) नियम आहे, म्हणून हे आपले तोंडी लावण्यापुरते फोटो.
तर, आपल्याला लागणार-
मळलेली कणीक
थोडे जिरे किंवा जिरेपूड
तिखट
पुदिन्याच्या पानांचा चुरा असेल, तर वा! वा!
तूप / तेल ( तूप किंवा तेल वापरू शकता)
कणिक मस्तपैकी मळून घ्यायची.
पराठे करताना, प्रथम तवा तापायला ठेवायचा.
आता, नेहमी चपात्या/ पोळ्यांसाठी घेतो, त्यापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन, पुरीसाठी करतो, त्यापेक्षा थोडा मोठा आकार होईल, इतपत लाटायचे. आता ह्या लाटलेल्या पातीवर एक - दोन चिमटीभर तिखट, जिरे ( किंवा जिरेपूड) घाला.
असला तर पुदिन्याच्या सुकवलेल्या पानांचा चुरा पसरा. माझ्याकडे चुरा नव्हता, पण पुदिन्याची पाने होती, ती बारीक कापून तीच घातली.
पुदिन्याच्या पानांचा चुरा टाकून, असं दिसेल.
आता ह्यावर एक दोन चमचे तूप टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचे व घडीच्या पोळीप्रमाणे लाटायचे. खूप पातळ लाटायचे नाही. तव्यावर आता हा लाटलेला पराठा भाजायला टाकायचा.
खालची बाजू जरा भाजली की परतून घ्यावी, आता वरच्या बाजूला तूप लावावे व पराठा थोड्या वेळाने पुन्हा परतून दुसऱ्या बाजूलाही तूप लावावे व दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजावा.
दही/ सॉस/ चटणी बरोबर खाण्यासाठी किंवा तसाच खायला पराठा तयार!
इति श्री आंतरजालम् पराठापुराणम् संपूर्णम्|

वाचने
32936
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
सर्व वाचकांचे आभार!
मस्त !
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरवणी प्रतिसाद.
In reply to पुरवणी प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) अंडे घालून कसे लागेल
In reply to १) अंडे घालून कसे लागेल by गवि
दोन्हि प्रकार
In reply to दोन्हि प्रकार by प्रशांत
म्हण्जे अंडे पण घालणार काय?
In reply to म्हण्जे अंडे पण घालणार काय? by प्रचेतस
हो ना
In reply to १) अंडे घालून कसे लागेल by गवि
बैदा रोटी
In reply to बैदा रोटी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाक चोंदले असेल. हॅ हॅ हॅ..
In reply to बैदा रोटी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा .... हा .... हा
In reply to पुरवणी प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंडे घातल्यावर पराठा झटपट
In reply to अंडे घातल्यावर पराठा झटपट by प्रचेतस
अंडे घालून किती वेळ झाला आहे
In reply to अंडे घालून किती वेळ झाला आहे by गवि
=))
In reply to अंडे घालून किती वेळ झाला आहे by गवि
खिक्क
मस्त व सोपी पाककृती
साधी सोपी पाकृ.
In reply to साधी सोपी पाकृ. by प्रचेतस
साधी सोपी, तरीही आयती हवी.
In reply to साधी सोपी पाकृ. by प्रचेतस
अंडे टाकुण?
In reply to अंडे टाकुण? by प्रशांत
अंडे खात नाही तर टाकण्याचा
In reply to अंडे खात नाही तर टाकण्याचा by प्रचेतस
अंडे खात नाही म्हणूनच ते
In reply to अंडे खात नाही म्हणूनच ते by डॉ सुहास म्हात्रे
=))
In reply to साधी सोपी पाकृ. by प्रचेतस
लग्न झालेले असल्यास !
In reply to लग्न झालेले असल्यास ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही केलेली एखादी पाकृ
In reply to तुम्ही केलेली एखादी पाकृ by प्रचेतस
सरांनी बनवलेलं काही म्हणजे
In reply to सरांनी बनवलेलं काही म्हणजे by गवि
अगदी अगदी, किंवा चहा म्हणून
In reply to तुम्ही केलेली एखादी पाकृ by प्रचेतस
मला येत नै.
चला आता इथे रेसिपीचे जिन्नस
In reply to चला आता इथे रेसिपीचे जिन्नस by गवि
वाट पाहतोय.
In reply to वाट पाहतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to सहमत by प्रचेतस
एक गोष्ट नमूद करावी वाटते.
In reply to एक गोष्ट नमूद करावी वाटते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही दर्शविलेल्या या आदराने
In reply to तुम्ही दर्शविलेल्या या आदराने by गवि
आता बिल मात्र तुम्हीच द्या.
In reply to एक गोष्ट नमूद करावी वाटते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्याबद्द्ल अगदी सहमत. ते
सोप्पी आणि छान पाककृती यशोधरा
मलबारी पराठा
In reply to मलबारी पराठा by Rajesh188
ते जबरदस्त लागतात चवीला.
हा दंगा वाचून खूपच मज्जा आली!
In reply to हा दंगा वाचून खूपच मज्जा आली! by यशोधरा
सर्व दंगेकर्यांना त्यांनीच
थोड्या वेळाने येतो.
In reply to थोड्या वेळाने येतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किती अवांतर कराल?
In reply to किती अवांतर कराल? by गवि
ब्वॉर...!
In reply to ब्वॉर...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यांना
आम्ही मूली/कोबी /बटाटा याने
In reply to आम्ही मूली/कोबी /बटाटा याने by कंजूस
आयडी किमान...
मस्तं दिसतोय झटपट पराठा.
झकास.
In reply to झकास. by चौथा कोनाडा
कणिक मळताना घातलेलं असतं की
In reply to कणिक मळताना घातलेलं असतं की by यशोधरा
ओके,
आमच्यात स्वयंपाक बनवतात आणि मग डायरेक्ट खातात
बाबौ !
In reply to बाबौ ! by सस्नेह
काही ज्येष्ठ मिपाकर्स ईतक्या चांगल्या धाग्यावर बेक्कार धुडगूस
निव्वळ पराठा
In reply to निव्वळ पराठा by नाखु
साधीच कणीक की. एकदम फटाफट
In reply to निव्वळ पराठा by नाखु
पहिली स्ष्टेप बदला
वा वा..
पराठा हलका ठेवत आहेत.
सोप्प वाटत आहे करून बघायला
एक इचारायचंय
पुरण - दा - प्राठा
In reply to पुरण - दा - प्राठा by चामुंडराय
हायला तुमचा प्रतिसाद वाचून
छान. ..