मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"रजनीकांत" आणि काही "मुक्ताफळे ".............

छोटा डॉन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
* कांद्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण 'रजनीकांत' कांद्याच्या डोळ्यात पाणी आणू शकतो .... * तुम्ही 'रिसायकल बिन ' मधल्या फाईल डिलिट करू शकत असाल पण तो खुद्द 'रिसायकल बिन' डिलीट करू शकतो ........ * तो तुम्हाला 'कॉर्डलेस फोन' च्या साह्याने गळफास देउ शकतो ........ * तो पीयानो वाजवून त्यामधून 'व्हायोलीन' ची सुरावट काढू शकतो ......... * तो खोलीत प्रवेश केल्यावर तेथील अंधार दूर करण्यासाठी तो लाईट चालु करत नाही , त्याऐवजी तो अंधार बंद करतो ....... * त्याला एकदा 'हार्ट-ऍटॅक' आला होता , तेव्हापासून त्याचे हृदय बेपत्ता आहे ....... * जेव्हा तो आरश्यात पाहतो तेव्हा आरशाचे तुकडे तुकडे होतात कारण २ रजनीकांतांच्या मध्ये उभी राहण्याची आरश्याची हिंमत होत नाही ...... * जर 'ब्रेट ली' ताशी १५० किमी वेगाने चेंडू फेकत असला तरी रजनीकांत 'ब्रेट ली' ला त्यापेक्षा जास्त वेगाने फेकून देउ शकतो ........ * गणिती व्याख्येमध्या 'पाय' चा शेवटाचा अंक रजनीकांत आहे की ज्याला कधीच अंत नाही ..... * रजनिकांतला त्याचा शत्रू कुठे राहतो ह्याच्याशी काही देणे घेणे नाही पण तो कुठे मरणार आहे हे स्वता 'रजनीकांत' ठरवतो .......... * कुठल्याही बंदूकीची गोळी त्याचे शरीर भेदण्यास समर्थ नाही पण तो आरामात गोळीचे २ तुकडे करू शकतो ..... * 'अंपगांसाठी असलेल्य पार्कींगच्या जागेचा' खरा अर्थ 'हा रजनीकांत चा एरिया आहे तेव्हा येथे पार्कींग केल्यास तुम्ही अपंग होण्याची शक्यता आहे' असा आहे........ * रजनीकांतच्या दिनदर्शीकेत १ एप्रील ही तारीख नाही , कारण त्याला कोणीच मुर्ख बनवू शकत नाही ......... * जर तुम्ही 'गूगल सर्च' मध्ये रजनीकांतचे 'स्पेलींग' चूकीचे लिहले तर 'तुम्हाला रजनीकांत म्हणायचे आहे का ?' ह्या संदेशा एवजी 'पळा , तुमच्याकडे अजून संधी आहे' असा सल्लावजक संदेश येतो ........ * एकदा 'किंग कोब्र्याने' रजनीकांत ला दंश केला , ५ दिवसांच्या मरणयातना भोगल्यानंतर 'किंग कोब्रा ' मरण पावला ....... * तुम्ही एका दगडात २ पक्षी मारत असाल तर तो एका पक्ष्याने २ दगड खतम करू शकतो ....... * आजचे सर्वोत्तम किटकनाशक ९९.९९% किटकांचा सफाया करण्याचा दावा करते, पण रजनीकांत ला जर कुणाला मारायचे असेल तर तो मरण्याची शक्यता केवळ १०० % च असते ....... * 'जागतीक तापमान वाढ ' ही संकल्पना खोटी आहे, एकदा रजनीकांतला थंडी वाजत असल्याने त्यानेच 'सुर्याचे' तापमान वाढवले होते ते आता तसेच राहिले आहे ..... * तो 'भिंगाच्या' साह्याने 'रात्री ' सुध्धा आग लाउ शकतो ........ * त्याला मानवी जीवनाबद्दल प्रचंड आदर आहे जोवर त्या त्याच्या मार्गाआड येत नाहीत ......... * त्याने एकदा जोराने आरोळी ठोकून 'अमेरिकन फायटर प्लेन' पाडले होते ......... * एका सर्वसाधरण बैठकीच्या खोलीत असणाऱ्या १२०० वस्तूंपैकी तो कुठल्याही एकाने तुम्हाला मारू शकतो , यात त्या खोलीचाही समावेश होतो ......... * असे म्हणतात की 'प्रत्येक यशामागे एक स्त्री असते" , तर "प्रत्येक मारल्या गेलेल्या माणसामागे एक आणि एकच रजनीकांत असतो" ......... * त्याला चालकाचा परवाना वयाच्या '१६ व्या सेकंदाला ' मिळाला , ज्यासाठी तुम्हाला आज १६ वर्षे वाट पहावी लागते .......... * दुख्खाचे वर्गमूळ रजनीकांत आहे पण जर तुम्ही त्याचा वर्ग करायला गेलात तर त्याचा परिणाम फक्त आणि फक्त मृत्युच आहे ....... * जर तुम्ही त्याला " नो बडी इज परफेक्ट " हे वचन ऐकवले तर तो हा त्याचा वैयक्तीक अपमान मानून तुमच्यावर पुढील योग्य कारवाई करेल, त्याला तशी परवानगी आहे ........ * देव स्वर्गात राहतात कारण त्यांना रजनीकांत बर पृथ्वीवर राहणे परवडणार नाही..... * जेव्हा तो व्यायामासाठी 'पुश-अप्स' काढतो तेव्हा तो स्वताला वर उचलत नसून जमीनीला खाली ढकलतो ..... * त्याच्या पळण्याचा वेग प्रचंड आहे, तो कुठल्याही वस्तू भोवती जोरात गोल पळून स्वताच्या 'पाठीला धप्पा ' देउ शकतो .... * तो घड्याळ घालत नाही , कारण तो स्वता वेळ ठरवतो ..... * 'मोनालीसा' च्या चेहऱ्यावरचे जगप्रसिध्ध हास्य तीने जेव्हा 'रजनीला' पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उमटले ........ * त्याच्या घराला दारे/खिडक्या नाहीत , तो जाण्या-येण्यासाठी भिंतींचा वापर करतो ........... * कॉफी करताना तो कॉफीची पूड दाताने बारीक करून ती स्वताच्या अंगातल्या गरमीने गरम केलेल्या पाण्यात टाकतो ......... * गूगल-सर्च मध्ये 'रजनीकांत मार खाताना ' ह्याशोधाचे "०" परिणाम येतात ..... * ईराकमध्ये कुठलेही अतिसंहारक शस्त्रे सापडली नाहीत कारण रजनीकांत चेन्नई मध्ये राहतो व ते भारतात आहे ......... * एकदा त्याने झोपेच्या गोळ्याची अख्खी बाटली खाल्ली होती , त्यामुळे त्याला थोडी पेंग आली .......... * त्याच्या पेक्षा जोराने व लांबपर्यंत धावणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याचे 'सिनेमे '......... * त्याच्या प्रत्येक पावलामुळे एक नवे वादळ निर्माण होते , अमेरिकत आलेली वादळे " कतरीना , रिटा " हा त्याच्या सकाळच्या "जॉगिंग" चा परिणाम मानला जातो ....... संग्राहीत ..... [ छोटा डॉन ]

वाचन 24217 प्रतिक्रिया 47