Relaxed Attentive
थोडं मुक्तचिंतन करायचा प्रयत्न करतोय.
मॅट्रिक्स सिनेमात मॉर्फियस निओ ला मार्शल आर्ट शिकवताना सांगतो, 'Don't try to hit me, and hit me!' सिनेमा बघितल्यापासून त्यातली अनेक वाक्य जी समजायला अवघड आहेत असं वाटलेलं त्यापैकी हे एक. अनेक वाक्य दरवेळी नव्याने अधिक उलगडत जातात. हे त्यातलंच एक.
किंवा कॅरम खेळणाऱ्या तरबेज लोकांचा खेळ बघणं पर्वणी असते. त्यांचा गेम प्लॅन, स्ट्रोक्स च नियंत्रण वगैरे गोष्टी आकर्षक असतातच पण मला मोहात पाडते ती गोष्ट थोडी वेगळीच. अनेक वर्षांच्या गॅप नंतर कॅरम खेळायला सुरवात केल्यावर काही काळाने बरी पकड आली खेळावर. अनेकदा अवघड सोंगट्या पण हुकमी घेता येऊ लागल्या. पण अनेकदा अनुभव असा आला की उत्तम खेळणाऱ्या समोर साधारण 5व्या बोर्ड नंतर बाजी उलटायला सुरवात होत असे. म्हणजे एकदा तर 18-0 आघाडी असताना मी गेम हरलो होतो.
नंतर त्याच्याशी बोललो तेंव्हा काही मुद्दे स्पष्ट झाले. खेळताना मी टेंस होतो. तो ताण 8 बोर्ड कायम ठेवून उत्तम खेळत राहणं अवघड असतं. खेळताना न ठरवलेल्या गोष्टी घडत असतात. उदा. पाचव्या ब्रेकमध्ये माझे 2 डबलड्यु झाले होते. त्यामुळे मी डिस्टर्ब झालो. आणि मग चुका वाढत गेल्या.
सगळ्याचं सार असं की या मोठ्या खेळाडूंकडे एक दुर्मिळ मानसिकता असते. Relaxed Attentiveness असं म्हणता येईल त्याला. ते नेम धरत नाहीत तर त्यांच्याकडून नेम धरला जातो, ते स्ट्रायकरला टिचकी मारत नाहीत तर ती त्यांच्याकडून मारली जाते. सोंगटी घेतली जावी अशी इच्छा धरूनच खेळतात पण नाही गेली तर मनःस्थिती बिघडत नाही. परिस्थिती अवघड आहे, स्ट्रायकर हाती आल्यावर समोरच्याच्या फक्त 3 सोंगट्या बाकी आहेत याचं त्यांना टेन्शन येत नाही. They are in a zone, trans like state of mind.
अशी मानसिकता कॅरमच नव्हे तर सगळ्या खेळातल्या उच्च खेळाडूंची असते. आयुष्याचा खेळ खेळताना आपली मानसिकता तशी करता आली तर त्यासारखं सुख नसेल.
तुम्हाला काय वाटतं मंडळी?
-अनुप
वाचने
7624
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
खरंय
+1
कॉलिंग संक्षी..त्यांचे यातले
In reply to कॉलिंग संक्षी..त्यांचे यातले by आनन्दा
संक्षी कोण आहेत? मी नवखा
छान लेख.
In reply to छान लेख. by mrcoolguynice
(No subject)
In reply to (No subject) by mrcoolguynice
हे?
In reply to हे? by तुषार काळभोर
रैट्ट
.
Short and Sweet...
मस्त ! कॅरम हा खेळ नेमबाजी
अजून एक वाक्य
In reply to अजून एक वाक्य by विजुभाऊ
Know.. there is no spoon!
उत्तम लिहिले आहे. शांत
In reply to उत्तम लिहिले आहे. शांत by दुर्गविहारी
त्याच्या शांत डोक़्यामुलेच
लिहिलेले आवडले.
In reply to लिहिलेले आवडले. by शेखरमोघे
मिळवतो..
एक प्रकारची जागृत समाधी