होत नाही कपातला चहा गार आता
लेखनविषय:
ना लोचनी आसवांचा तुलाभार आता
नको उगा हासण्याचा तुला भार आता
शब्दांनी शब्द पोहोचवणे सुरू केले
उरला न अर्थ त्यांना तसा फार आता
गंजला खंजीर पाठीत कधीचाच सखे
ये पुन्हा नवा करायला तसा वार आता
करणे विचार तुझा आकाश सोडले
होत नाही कपातला चहा गार आता
आकाश....
वाचने
1816
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
>>होत नाही कपातला चहा गार आता
हेच लग्न झाल्यावर असे दिसेल
In reply to हेच लग्न झाल्यावर असे दिसेल by महासंग्राम
हाहाहा
+1