(धागा काढण्याची तल्लफ)
काव्यरस
स्वामी चरणी समर्पित
...
डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला
वाचण्यातील साधेपणा संपू लागला
तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....
तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा
आशयाची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला हेतूच दिसेनासा झाला !
धागा काढल्यावर चर्चा होईलच
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा
उगाचच हसे होताना, होउ द्यावे
मुळातच धागा बदबदा काढू नये
वाचकांना कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये
आता, डोक्यातील जळमटांना तसेच ठेउ नये
जाउ पाहणाऱ्या शब्दकचर्याला थोपून ठेवू नये.....
धागा काढण्याची तल्लफ मात्र.....??
तल्लफ काही माझ्या आधीन नाही......
वाचकांचीही पत्रेवाला नाखु
वाचने
12720
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
जबराट लिवलंय
पेरणा वाचतानाच तुम्ही आता असे काहीतरी लिहाल असे मनात आले होते
पैजारबुवा,
=)) =)) =))
धाग्यांचे जिथेतिथे मळे फुलवायचेय
मला लवकरच कोटीवीर व्हायचेय
दिवसाला दळायचेय दहा किलो कमीतकमी
ओळखलं नाहीत मला , मी येक नंबर स्वामी
किती लिहू आणि काय लिहू
नकोनकोसे होते
प्रतिसाद आले रे आले
कि अजून स्फुरण चढते
वाचकांना काय वाटते
याचे मला काय त्याचे
मी तर धागे काढत जाणार
जरी असले कन्टेन्टचे लोचे
गोंगाट, गदारोळ माजतो या मंचावर
धागा येता माझा
ओळखाल का कुणी खरे मला ?
शोधून दाखवा आंजावर
In reply to ==)) जबराव जबराव जबराव ==)) by खिलजि
हे पण १ नंबर
आता थांबणे नाही, नुसते धागे काढून होणाऱ्या टींगलटवाळी ला मराठी माणूस घाबरणार नाही, आता कवितेचा मळाही फुलवावा लागणार हे तो स्वामिंची १ नंबर ईच्छा
स्वामि कृपा असू द्या! :)
घाबरु नका स्वामि ! मी तुमच्या पाठीशी आहेच. मराठी माणसाचे हीत न बगवनारे असल्या दुत्त दुत्त नाखुचाचांकडे तुम्हि लक्ष देउ नका. तुमची धाग्यांची कुरपा अखंडित राहु देत. आणखी असेच धागे निगावेत हि तो स्वामींची, चुकले श्रींची ईच्छा. ;-)
In reply to घाबरु नका स्वामि ! मी तुमच्या by दुर्गविहारी
खैर समज होतोय,हे पुष्प स्वामीचरणी समर्पित केले आहे,तुम्ही आणंदावर वीरझण टाकले नाही आणि सांभासिकी दिली तर अजून मोठा पुच्छगुच्छ स्वामींना अर्पण करीन.
शुद्धलेखन आणि वाक्यरचना फाट्यावर मारणे हेच मराठी माणसाचे आद्यकर्तव्य हीच स्वामिशिकरण
स्वामिशिकवण
अज्ञ बालक नाखु
लय भारी नाखुमामा!
आता मराटी मानुष, अमानुष खवळून उठेल.
नाखु तुम्ही हे बरोबर केले नाही. आता ' नाखुच्या अन्यायकारी टिंगलटवाळीपासून वाचण्यासाठी क़ाय करावे?' असा धागा निघाला तर जबाबदार कोण?
आता मराटी मानुष, अमानुष खवळून उठेल.
नाखु तुम्ही हे बरोबर केले नाही. आता ' नाखुच्या अन्यायकारी टिंगलटवाळीपासून वाचण्यासाठी क़ाय करावे?' असा धागा निघाला तर जबाबदार कोण?
काय न काय सुरु राहीलं पाहिजे.
-दिलीप बिरुटे
कविता वाचनात फारसे स्वारस्य नसलेल्या माझ्या सारख्या वाचकांच्या मनात कवितेबद्दल रुची निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे तुमच्या लेखणीत.
मजा आली वाचायला!
नाखू आणि खिलजी दोघांच्याही कविता एकच नंबर. मजा आली वाचतांना.
तुमच्या कवितेचे प्रेरणास्त्रोतांनी यातून काही अर्थबोध घेतला तर कवितेचे व्रत सुफळ संपूर्ण झाले म्हणायचे.
हीहीही.....