मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महागाईच्या गप्पा

बी.डी.वायळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ऑफिसमध्ये काल बायका मारत होत्या गप्पा | महागाईचा विषय होता साधा आणि सोपा | काल जेंव्हा बाई मी मार्केटला गेले | भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले| पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी| एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी | एकरुपयाचे लिंबु पाच रुपयाला झाले | कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले | बारा रुपये पाव किलो वांगी व कारले | फ्लावर व कोबी बघुन डोकेच फिरले | पंचविस तीस रुपये किलो होते तेथे गहू | तांदुळ म्हणाला मला हातच नका लावू | शंभर रुपये किलो झाली तुरीची डाळ | भडकलेले होते हरबरे आणि वाल | साखरेचा भाव तर चाळीसवर गेला | तेलाचा डबा पण किती महाग झाला| दुध झाले महाग पन्नास रुपये लिटर | विचारायलाच नको चीज आणि बटर | सगळीकडेच भडकलिय अशी महागाई| काय खावं काय पिवं तेच कळत नाही | बी.डी.वायळ

वाचने 1668 वाचनखूण प्रतिक्रिया 4

अभ्या.. 22/04/2019 - 13:48
गली बॉयच्या रॅप स्टाईलमध्ये पण म्हनता येतंय. अधून मधून अं, अं. योय् यो, कमऑन असले अ‍ॅडिशन टाकावे लागतील.

श्वेता२४ 22/04/2019 - 15:37
खरंय, खरंय. मी रॅपसारखं पण म्हणून बघितलं. जमतंय. थोडक्यात या कवितेला गेयता आहे. ;)