Skip to main content

तू चंद्र माझा

लेखक प्रणया यांनी सोमवार, 15/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
तू चंद्र माझा शांत,शुभ्र, साजिरा तूज स्पर्शिण्या तूज मागे धावणारे उथळ अभ्र मी.... येवून कवेत तूझ्या नीखळ उब मनी भरावी प्रकाशावे मी एवढे की लाजावी मजसमोर चांदणी....
लेखनविषय:

वाचने 6047
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by यशोधरा

हा प्रतिसाद अजून थोडा विस्तृत दिला असतात तर बरे झाले असते. नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? का पटत नाहीये ही कल्पना तुम्हाला? तुमच्या स्पष्टीकरणाची झाली तर मदतच होईल लेखिकेला नाही का? तुम्ही काय करावं काय नाही हे सांगण्याचा अधिकार मला मुळीच नाही पण आपलं मत स्पष्ट शब्दात मांडता यावं इतके प्रगल्भ वाचक नक्कीच आहेत इथे. माझंही मत मी स्पष्ट शब्दात व्यक्त केलं म्हणून राग मानू नये. धन्यवाद.

In reply to by सिक्रेटसुपरस्टार

मला तेच म्हणायचे आहे जे मी लिहिले आहे! आधीच कविता चिमकुली ( चिमुकली नाही बरं) त्याला प्रतिसाद मोठा म्हणजे मियां मुठभर आणि दाढी हातभर असे नाही का होणार? म्हणून हो! तुम्ही इतरांना हातभर प्रतिसाद लिहिण्यापेक्षा कवितेबद्दल नाही का लिहायचे? च्च!

In reply to by यशोधरा

अच्छा, सगळ्यांनाच तुमचे क्रिप्टिक प्रतिसाद कसे समजतील? म्हणून सविस्तर लिहण्याची विनंती केली. मला कवितेबद्दल जे खटकलं ते खाली एका प्रतिसादात लिहले आहेच. तुम्हालाही त्याच बाबतीत आक्षेप आहे हे प्रतिसादातून कळत नव्हते. मला वाटलं तुम्हाला ही कल्पनाच आवडली नाही, त्यामुळे गैरसमज झाला. असो, लेखिकेने आता तुमचे इथले प्रतिसाद आवरा म्हणायच्या आधी रजा घेतलेली बरी.

सुंदर! थोडी अजून मोठी असती तर जास्त मजा आली असती.

In reply to by प्रसाद गोडबोले

तो ती अन चंद्र असा मामला आहे तर. अन जावू द्या हो. काहीतरी दर्जेदार व्हायला हवे की नको? इतक्या दिवसात काय शिकलात? पुढे जायचे की नाही? की आहे तेथेच रहायचे? मुलगी शिकली प्रगती झाली. पाणी गाळा नारू टाळा. रस्तेपर मस्ती, जान नही सस्ती.