मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अश्वत्थ

अन्या बुद्धे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अनंत पानांचा अश्वत्थवृक्ष सळसळतो आहे.. विशाल खोडावर अवकाशात घुसलेला खोड फांद्यांचा पसारा.. सृष्टीतून जीवनरस शोषून घेत, ऊन पाऊस झेलत त्याचा उत्सव सुरू आहे.. प्राचीन खोडावर जाड सालींच्या वळ्यामधून मुंगी किटकांच्या वसाहती फोफावल्या आहेत.. तरहतर्हेचे पक्षी तिथे येऊन 'हे माझं जग' असं म्हणतात गाणी गात पानांना ऐकवतात.. जरठ जाड पाने शांत समाधानी मनाने जीवनरसाचा शेवटला थेंब मिळेतो थांबतात.. हिरवेपणा टिकवून अन्न तयार करतात.. निवृत्त मनाने गळून जातात पिंपळाच्या मुळांचे अन्न होत मातीत मिसळतात.. लाल तजेलदार नाजूक पाने वाऱ्यावर हलतात, कुतूहलाने जगाकडे बघतात कुंभार माशी 4 पाने कातरते फेऱ्या मारत घेऊन जाते.. तिच्या पिल्लांसाठी घर बांधायचं काम उत्साहात सुरू असत.. सर्वत्र जीवनाचा उत्सव सुरू आहे! झाडाखाली पारावर.. काही माणसे बसली आहेत, एकटी, पेपर वाचत, वा तावातावाने वाद करत.. कुणी नोकरी नाही म्हणून चिंतेत, कुणी मित्राशी पैशावरून भांडलेला.. कुणाच्या सुरकूतलेल्या चेहऱ्यावर दुष्काळाचं सावट, मनात मुलीच्या लग्नाची काळजी.. सगळे जीवनोत्सवाच्या छायेत आहेत, तरी त्यापासून वंचित.. त्यांच्या जगण्यातला उत्सवाचा आनंद हरपलेला, फक्त कोरडा व्यवहार शिल्लक उरलेला.. -अनुप

वाचने 2133 वाचनखूण प्रतिक्रिया 6

यशोधरा 10/04/2019 - 17:11
अनंत पानांचा अश्वत्थवृक्ष सळसळतो आहे.. विशाल खोडावर अवकाशात घुसलेला खोड फांद्यांचा पसारा.. सृष्टीतून जीवनरस शोषून घेत, ऊन पाऊस झेलत त्याचा उत्सव सुरू आहे.. प्राचीन खोडावर जाड सालींच्या वळ्यामधून मुंगी किटकांच्या वसाहती फोफावल्या आहेत.. तरहतर्हेचे पक्षी तिथे येऊन 'हे माझं जग' असं म्हणतात गाणी गात पानांना ऐकवतात.. जरठ जाड पाने शांत समाधानी मनाने जीवनरसाचा शेवटला थेंब मिळेतो थांबतात.. हिरवेपणा टिकवून अन्न तयार करतात.. निवृत्त मनाने गळून जातात पिंपळाच्या मुळांचे अन्न होत मातीत मिसळतात.. लाल तजेलदार नाजूक पाने वाऱ्यावर हलतात, कुतूहलाने जगाकडे बघतात कुंभार माशी 4 पाने कातरते फेऱ्या मारत घेऊन जाते.. तिच्या पिल्लांसाठी घर बांधायचं काम उत्साहात सुरू असत.. सर्वत्र जीवनाचा उत्सव सुरू आहे!
सुंदर. डोळ्यांपुढे चित्र उभं राहिलं.