(बंद कळफलकामागचा वाचक)

नाखु जे न देखे रवी...
एक वाचक कळफलकाबरोबर बघतो आहे मिपा कसले मिपा ? स्वत:च्या कक्षेत, जालजंजाळाच्या पार जिथे हर एक लेखकू बसला आहे क्षुब्ध.... करत असेल का तो ही (कधीकधी)वाचकाचा विचार? वाचत असेल का तो ही इतरांचेही आहेर, विरोधाच्या (चष्म्या) पलीकडे? वाचक त्याच्या वाचनदुनियेतून बाहेर येऊ शकत नाही... मग तो त्याचे मूक प्रतिसाद पाठवतो, ते प्रतिसाद डोक्यात (न)घेऊन लेखक निवांतपणे मख्ख राहतो.... मिपा हरवलेला वाचक जुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो, पुन्हा पुन्हा चाचपडत राहतो... वाचकांचीच पत्रेवाला नाखु

9 टिप्पण्या 4,968 दृश्ये

Comments

चौथा कोनाडा नवीन

+१ भारी, नाखुसाहेब !

चित्रगुप्त नवीन

समयोचित आणि प्रांजळ मनोगत.
मिपा हरवलेला वाचक जुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो, पुन्हा पुन्हा चाचपडत राहतो...
.. अगदी असेच .

ज्ञानोबाचे पैजार नवीन

जबरा हे व्हर्जनही आवाडले, पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले नवीन

अप्रतिम !! बाकी मोदी समर्थक / विरोधक , आस्तिकनास्तिकवाप फेम चनावाला , माजघर कोनाडा , अति आणि सर्वत्र मीचीलाल संप्रदाय इत्यादी आतातायी लोकांनी मिपावरील खेळीमेळीच्या वातावरणाची वाट लावली असे आमचे स्पष्ट मत आहे . असो. इत्यलम !

चौथा कोनाडा नवीन

In reply to by प्रसाद गोडबोले

मोदी समर्थक / विरोधक , आस्तिकनास्तिकवाप फेम चनावाला , माजघर कोनाडा , अति.....
अप्बाप रे .... चक्क अम्चं नावं (कोनाडा ?)

खिलजि नवीन

एकेक खतरनाक कविता वाचतोय ,, असा बोनस भरपूर काळानंतर आला आहे ... कुणी मनातलं सांगतोय तर कुणी कुणाच्या भावना थेट वाचणाऱ्याच्या काळजात उतरवतोय...मस्तंय मस्तच

नाखु नवीन

वाचकांचे आणि अवाचकांचेही आभार