मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काचेच्या अलिकडून

चाणक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
बहुतेक वेळेला मी मान फिरवूनच घेतो किंवा लक्ष नाही असं दाखवतो नाहीच जमलं दुर्लक्ष करणं तर मानेनेच नाही म्हणतो आणि कधीकाळी दिलेल्या दहा रूपड्याचं गणित मांडून स्वतःचच समर्थन करतो... पण खरं सांगायचं तर, आत एक द्वंद्व चालू असतं कारण मला पक्कं ठाऊक असतं की, नकार, अपमान, एकटेपण, तिरस्कार, नाकारलेपण, संघर्ष, या शब्दांचे अर्थ मला नाही कळणार कधीच.... ते कळतील फक्त गाडीच्या बंद काचेबाहेर असणा-या आणि बेदरकार नजरेने आयुष्याशी दोन हात करत असणा-या ....त्या हिजड्याला

वाचने 6337 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चांदणे संदीप 09/03/2019 - 21:34
पोचली. नकार, अपमान, एकटेपण, तिरस्कार, नाकारलेपण, संघर्ष यांची धग कवितेत उतरली आहे. Sandy

बाप्पू 12/03/2019 - 12:02
लेखन आवडले. तृतीयपंथी लोकांबद्दल नेहमीच सहानुभूती वाटते. कसे सहन करत असतील ते लोक देव जाणे..

दुर्गविहारी 12/03/2019 - 18:52
मागच्या आठवड्यात झी मराठी वरच्या "कानाला खडा" या टॉक शोमध्ये हिजड्याची मुलाखत होती. त्यामुळे आज हि कविता वाचल्यावर जास्तच भिडली. सुंदर.

ज्ञानोबाचे पैजार 13/03/2019 - 09:13
आवडली असे तरी कसे म्हणू? पैजारबुवा,