मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घड्याळ

जागु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जोराने एवढ्या ओरडू नकोस थोडावेळ थांब उशिरा झोपले रात्री , अंगाला चढलाय आम टक टक तुझी सदा चालू असते जग सारे तुझ्याभोवती घुटमळत असते. २४ तास तुझे न चुकता जागतोस अर्ध्या पेक्षा जास्त त्यात आम्हालाच राबवतोस. ऑफीस चालू बंद करण्याची तुझ्यात असते ताकद आम्हाला मात्र सुट्टीची मोजावी लागते किंमत. नको तेव्हाच कधीतरी बंद पडतोस आणि कामाचा सगळ्या बट्याबोळ करतोस. जन्मा पासुन मरणा पर्यंत तुझा असतो सहवास एखाद दिवस नसशील तर दिवस होतो भकास.

वाचने 1605 वाचनखूण प्रतिक्रिया 2

क्रान्ति Wed, 03/18/2009 - 20:21
छान. खूप पूर्वीची आजीचे घड्याळ ही कविता आठवली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}