अवकाश स्पर्धा (अमेरिकन बाजू)
प्रस्तावना
या लेखमालेत माझा कयास मुख्यत्वे अमेरिकेच्या सुरवातीच्या अवकाश मोहिमांच्याविषयी असेल. रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित उपग्रह प्रक्षेपित करून या स्पर्धेत आघाडी घेतली. नंतर त्यांनी पहिला अंतराळवीर देखील अवकाशात पाठवला. याला उत्तर म्हणून अमेरिकेने आधी मर्क्युरी आणि नंतर जेमिनी व प्रसिद्ध अपोलो मोहिमा राबविल्या.
मर्क्युरी मोहिमेचा मुख्य उद्देश एका मानवाला अवकाशात सोडणे व इतर तांत्रिक बाबी चेक करणे असा होता. जेमिनी या मोहिमेचा उद्देश अपोलो मोहिमेसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे हा होता (आवश्यक बाबी त्या त्या वेळी सांगितल्या जातील.) आणि अपोलो मोहीम ही मानवाला चंद्रावर उतरवणे व सुरक्षितपणे परत आणणे हा होता.
या मालिकेत मी सुरवातीला अवकाश स्पर्धेची सुरवात कशी झाली याबद्दल लिहिन. नंतर क्रमाक्रमाने मर्क्युरी, जेमिनी आणि अपोलो मोहिमांच्या विषयी माहिती देईन. सोबतच रशिया मध्ये काय काय घडत होते याबद्दल ही थोडक्यात सांगेन. या लेखात काही इंग्रजी शब्द जशेच्या तसे वापरावे लागतील नाहीतर त्या वाक्याचा (किंवा घटनेचा) नीटसा अर्थ कळणार नाही. पण लेखाच्या सुरवातीला किंवा शेवटी त्या इंग्रजी शब्दांचा अर्थ समजावयाचा प्रयत्न करेन.
वर्गीकरण
रोचक विषय निवडला आहात.
शुभेच्छा!
रोचक विषय आहे हा.
In reply to रोचक विषय आहे हा. by प्रसाद_१९८२
पाहिली आहे.
रोचक :)
मस्तच ! येवू द्या लवकर .
रोचक विषय
लवकर डकवा.