Skip to main content

तू

लेखक जयवी यांनी सोमवार, 16/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते तसे सोबतीच्या करारात होते नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा तुझ्या मुक्त केसातही रात होते पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला तुझे दाद देणे अकस्मात होते नसावे नशीबात घायाळ होणे तुझे तीर सारे पहार्‍यात होते निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2305
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा तुझ्या मुक्त केसातही रात होते आवडली.

पुन्हा जाग आली सुन्या मैफलीला तुझे दाद देणे अकस्मात होते वा! क्या बात है! एकदम सुरेख गझल जयूताई! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला तुझे दाद देणे अकस्मात होते नसावे नशीबात घायाळ होणे तुझे तीर सारे पहार्‍यात होते निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते जयू ताई, हे तिन्ही शेर म्हणजे.. कळस आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by राघव

येउ द्यात अजुनही !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

जयवी ताई, गझल आवडली. :) पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला तुझे दाद देणे अकस्मात होते निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते खुप सुंदर...:)

नसावे नशीबात घायाळ होणे तुझे तीर सारे पहार्‍यात होते - हे तर खासच.

निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते व्वा.. मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.