रफाल - भाग २
प्रश्न ११ – ToT तंत्रज्ञानाचे हस्तांतरण रफाल करारातून का वगळले गेले.
उ ११ – ToT वगळल्या शिवाय वाटाघाटी पुढे सरकत नव्हत्या. जर पुढे सरकणाऱ्या असत्या तर २०१२ मध्येच यूपीए सरकार असताना तो करार झाला असता. २०११ साली सगळ्यात कमी बोलीवर व बाकीच्या निकषांवर रफालची निवड होऊन सुद्धा २०१५ पर्यंत ToT मुळे वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचू शकल्या नाहीत ह्याचाच अर्थ हे कलम जर असच कायम ठेवले असते तर अजून पर्यंत वाटाघाटी पूर्ण झाल्या नसत्या व करार झाला नसता. ह्या कराराचे प्राथमिक उद्दिष्ट वायुसेनेच्या लॉंगटर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे त्यांना MMRCA विमाने उपलब्ध करून देणे होते, ToT हे जाता जाता जमले तर चांगलेच असे दुय्यम उद्दिष्ट. प्राथमिक उद्दिष्टच जेथे रखडले व पुरे होत नाही असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्टावर नजर लावून बसण्यात काय अर्थ आहे. आणि जर दुय्यम उद्दिष्ट साध्य करायच्या नादात प्राथमिक उद्दिष्ट संपुष्टात येत आहे असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्ट प्राप्त होण्यात काही अर्थ नाही. ह्याच दृष्टिकोनातून ते वगळले गेले. नाही तर विमाने आली नसती व ती येत नाहीत म्हणून ToT पण झाले नसते.
प्रश्न १२ – रफाल ची किंमत सार्वजनिक का करत नाहीत. किमतीची चर्चा का होऊ देत नाही. करारात सुरक्षे संबंधीत कोणते कलम आहे की जेणे करून त्याची किंमत सार्वजनिक होऊ शकत नाही.
उ १२ – प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. शस्त्र – त्याला तोड. त्या तोडाला तोड. हे सगळे जे कमी वेळात करू शकतात ते जिंकतात. सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो.
प्रश्न १३ – अंबानींना विमान बनवण्यात अनुभव आहे का.
उ १३ – त्यांनी पिपावाव कंपनी विकत घेतली जी बरीच वर्ष डिफेन्स प्रॉडक्शन मध्ये होती. बाकी कंपनी कशी आहे ते दासू ने जाणून घ्यायचे त्यांचा निकष महत्त्वाचा ऑफसेट त्यांनी फेडायचे आहे.
अंततः - मी हा लेख लिहिण्या मागचे उद्दिष्ट असे की वर्ष २००१ पासून रक्षा संपादन हे मन मानेल तसे कसे ही होत नाही तर त्या संपादना मागे एक कायदेशीर प्रक्रिया उभारली गेली आहे. ती प्रक्रिया पारदर्शक बनवण्याच्या धोरणातून निर्माण झाली आहे. आता ती पूर्वी सारखी भ्रष्टाचाराला चारा घालणारी राहिली नसून त्याला आळा घालणारी झाली आहे. अंतर सरकारी करार अशा प्रक्रियेला अजून मजबुती देतो, जिथे भ्रष्टाचारी लोक नाही तर थेट आपले सरकार दसर्या सरकारशी बोलून काय पाहिजे ते विकत घेते.
हा लेख विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर विश्वास बसू शकेल. प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे. जे काही नेते व काही पक्ष अपप्रचार करून विश्वास तोडण्याचे काम करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या भवितव्याच्या व पक्षाच्या अस्तित्वाच्या संभ्रमातून उद्भवलेली त्यांची गरज आहे व त्यामुळे वास्तव बिघडवण्याचा प्रयत्न आहे.
मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे.
तिसरा भाग लवकरच –
(क्रमशः)
प्रतिक्रिया
In reply to वरील दोन्ही व्हिडीओ पाहिल्यावर याउप्पर....... by विनोद१८
In reply to +१११ by नाखु
In reply to राफेल व्यवहारात अनियमितता नाही: सर्वोच्च न्यायालय by कापूसकोन्ड्या
In reply to मस्त निकाल by रणजित चितळे
In reply to आता सरकारने विरोधकांची जेपीसी by मार्मिक गोडसे
In reply to सर्वोच्च न्यायालयात by मार्मिक गोडसे
In reply to असं कोण म्हणतंय? by मार्मिक गोडसे
In reply to तेवढे तरी विचारून कशाला by मार्मिक गोडसे
प्रतिज्ञा ?
एक तर मी काही भीष्माचार्य नाही आणि प्रतिज्ञा घ्यावी असे इतके मोठे आपण आहात का हा प्रश्न स्वतःलाच विचारून पहाIn reply to इथे मी कधीच मोठेपणाचा दावा by मार्मिक गोडसे
In reply to हे व्हाट्सपवर फॉरवर्ड आले by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to माळी साहेब by सुबोध खरे
In reply to माळी साहेब by सुबोध खरे
In reply to एक प्रश्न. by शब्दानुज
In reply to आणि by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अगोदरच्या कुठल्या by सुबोध खरे
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to आणि by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to एक प्रश्न. by शब्दानुज
In reply to हे खरेच शक्य आहे का ? by सुबोध खरे
In reply to हे खरेच शक्य आहे का ? by सुबोध खरे
In reply to एक प्रश्न. by शब्दानुज
- मुळात हा व्यवहार B2B (Business To Business) वा B2C (Business To Consumer) अशा प्रकारचा नसून, G2G (Government To Government) असल्याने दोन्ही सरकारांच्या नैतिकतेची कसोटी पहाणारा आहे. त्यामुळे ईतर संरक्षण साहित्य खरेदीत झालेल्या/होणाऱ्या घोटाळ्यांमध्ये जसे मध्यस्थ/दलाल व राजकारणी हात वर करून मोकळे होतात तशी सोय ह्या व्यवहारात नसल्याने भ्रष्टाचार होण्याची शक्यता नगण्य आहे किंवा जर भ्रष्टाचार झाला/होणार असेल तर करारात सहभागी असलेले दोन्ही पक्ष त्यासाठी जवाबदार ठरणार असल्याने थेट द्वीपक्षीय भ्रष्टाचारात सामील व्हायला दोन राष्ट्रप्रमुख तयार झाले/होतील असे वाटत नाही.
- मूळ लेखात चितळे साहेबांनी लिहिल्या प्रमाणे "असल्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची किंमत बाजारात उपलब्ध नसते त्यामुळे वेगवेगळ्या माहितीवर व समितीच्या अनुभवावर एक किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस ठरवला जातो व त्याला मध्य मानून वाटाघाटींना सुरवात करतात" त्यामुळे किंमत उघड केल्यास रफाल खरेदी करण्यात रस असलेल्या ईतर देशांना कुठलीही मेहनत न करता ती माहिती आयतीच उपलब्ध होईल. उदाहरणातल्या जोशीकाकुंनी २०० रुपयांत नक्की काय काय आणलंय ह्याचा अंदाज लावण्यासाठी अत्यंत हुशार आणि दांडग्या अनुभवी टुंग टूंग काकूंना त्यांची बुद्धी शिणवण्याची गरजच पडणार नाही, त्या सरळ भाजीवाल्याकडे जाऊन तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा अधिक भाज्या तेवढ्याच किमतीत किंवा त्यापेक्षा कमी किमतीत मिळवण्यासाठी घासाघीस करतील :)
- हा व्यवहार/करार G2G (Government To Government) असल्याने त्या संदार्भात झालेल्या वाटाघाटीत फक्त रफाल विमानांचीच चर्चा झाली असेल असेही नाही त्या निमित्ताने काही ईतर मुद्देही चर्चिले गेले असतील, उदा. जगद्विख्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो' ने अल्जेरिया, अर्जेन्टिना, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इस्रायल, इटली, जपान, लक्झेम्बर्ग, नेदरलंड, दक्षिण कोरिया, सिंगापूर, स्वित्झर्लंड, टर्की, युके आणि यूएसए अशा जगातील अनेक देशांचे ५१ उपग्रह यशस्वीरीत्या अंतराळात नेऊन सोडले आहेत, पण त्यात फ्रान्सच्या फक्त २ उपग्रहांचा समावेश आहे. भविष्यात हा आकडा वाढवण्यासाठीही काही चर्चा झाल्या असू शकतात. तसेच इस्रो, डी.आर.डी.ओ. वा देसॉं तर्फे विकसित केल्या गेलेल्या पण प्रसिद्ध न केलेल्या कुठल्या गोपनीय तंत्रद्यानाचा/आयुधांचा वापर ह्या विमानांत करण्याबद्दलहि चर्चा झाली असू शकते.
- मध्यस्थ/दलालांना ह्या खरेदी व्यवहारातून/करारातून हद्दपार केल्याने आणि त्यांच्यामार्फत मिळणारा कमिशनरुपी मलिदा गमावल्याने विरोधकांनी केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी हा गदारोळ सुरु केल्याची खात्रीच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पटली आहे.
In reply to तुमचा प्रश्न आणि तंत्रज्ञानाचा भाजीपाला करणारे उदाहरण आवडले :) by टर्मीनेटर
In reply to तुमचा प्रश्न आणि तंत्रज्ञानाचा भाजीपाला करणारे उदाहरण आवडले :) by टर्मीनेटर
In reply to तुमचा प्रश्न आणि तंत्रज्ञानाचा भाजीपाला करणारे उदाहरण आवडले :) by टर्मीनेटर
In reply to तुमचा प्रश्न आणि तंत्रज्ञानाचा भाजीपाला करणारे उदाहरण आवडले :) by टर्मीनेटर
In reply to धन्यवाद.. by शब्दानुज
माझा प्रश्न किंमत लपवण्यासाठी लेखकाने दिलेले कारण हा आहे. दिलेले कारण हे आहे की कीमतीवरून शस्त्रांचा तोड काढता येतोसदर कारण सरकारने दिले आहे कि नाही ह्याची कल्पना नाही. जर तसे नसेल तर हे धागा लेखकाचे वैयक्तिक मत असावे, आणि त्यात तथ्य नाही या तुमच्या मुद्द्याशी सहमत आहे.
In reply to @ शब्दानुज by टर्मीनेटर
In reply to एक प्रश्न. by शब्दानुज
In reply to आयएनएस विक्रमादित्य by ट्रेड मार्क
In reply to आयएनएस विक्रमादित्य by ट्रेड मार्क
Gorshkov cost hike should not be made public in national interest: Defence ministry
काँग्रेसच्या काळात गोर्शकोव्ह/विक्रमादित्य या विमानवाहू नौकेची तीनपटींनी वाढवली किंमत जाहीर करणे... (अ) दोन सरकारांतील कराराचे (IGA) उल्लंघन होते, (आ) संसदेच्या विशेषाधिकाराचे (breach of parliamentary privileges) उल्लंघन होते, आणि (इ) राष्ट्राच्या हितसंबंधांना धोकादायक (prejudicial to the interest of the country) होते. असे असताना... युपिएच्या काळात २०% कमी किंमतीत झालेल्या राफालची खरेदीची तपशीलवार किंमत सांगितली नाही तर तो भ्रष्टाचार आहे, असा कांगावा करायला प्रचंड जाड गेंड्याची कातडी लागते, यात संशय नाही !!! =)) =)) =)) The ministry said any further information related to payments made by India or acceptance of upward revision in cost and time was not only bound by the clauses of the IGA but would also constitute a breach of parliamentary privileges and be prejudicial to the interest of the country. The deal for purchasing the ship, rechristened INS Vikramaditya, was signed in 2004 by the then NDA government at USD 974 million. The cost was raised to the final price of USD 2.35 billion in 2010.In reply to ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to France did not announce by प्रसाद_१९८२
In reply to फ्रान्सला निम्मे पैसे पोचले म्हणे by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to रच्याकने, लढाऊ विमाने म्हणजे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to डॉक्टर साहेब by सुबोध खरे
In reply to साहेब, by डॉ सुहास म्हात्रे
वरील दोन्ही व्हिडीओ पाहिल्यावर याउप्पर.......