मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाश्वेता

जृंभणश्वान · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वर्ष झाले असेल मी पाल बघून. परवा पालीवर माझी नावडती मैत्रिण हा लेख वाचला आणि पालीची खूप आठवण आली - कसा मी रोज सकाळी उठून अर्ध्या झोपेत धडपडत धडपडत बेसिनपाशी जायचो आणी पालीला बघुन दचकायचो. नंतर आपली रोजची पालच आहे ते बघुन कसा सुखावायचो वगैर वगैरे सगळे आठवून दाटून कंठ आला एवढी आठवण आली की मग कविता करण्याशिवाय पर्याय नव्हता. *किळसवाण्या सहित्यप्रकाराची ज्यांना किळस आहे त्यांनी कृपया वाचू नका महाश्वेता ओसरला हा संधिप्रकाश, दिनकरास करकच्च रजनीपाश झाल्या शुभंकरोत्या, अन्‌ आटोपली स्तोत्रे लावल्या खिडक्या आपटली दारे, घाबरल्या ताई, माई, अक्का अन्‌ हादरले बाळूचे पप्पा, फटीतून घुसले भिंतीवर बसले, चिलट म्हणावे का डास? बघून त्या गट्ट्या बाळूस पिपासूने बेत बनवला खास अहा, ते गोबरे गाल होतील कसे लाल चावण्यास कडकडून सर्वसज्ज हा डास पण... कडाडल्या वीजा थरारली धरणी चक्क चक्क चक्क चक्क, आवाज भिंतीवरून चक्क चक्क चक्क चक्क, आवाज ट्यूबमागून शक्ती ही दैवी कोणी घोर ही रणरागिणी रोखुन शीत हरितनेत्र फुलवुनी लिबलिबीत गात्र अवतरली ही महाश्वेता पांढरीफट्ट, पांढरीफट्ट रोवूनि पाय घट्ट आली एक सुपाल लांबवून जिव्हा चपळाईने क्षणार्धातच हा घेतला घास, पालोदरी विसावला पापी डास पालोदरी विसावला पापी डास * यडपट कसा हा बाळू मंद म्हणावे का द्वाड पसरून भोकाड म्हणतो आईगं, आईगं आली पाल, आली पाल ***

वाचन 3112 प्रतिक्रिया 19

खी खी खी मला 'महाश्वेता' मालिकेत त्या 'ऐश्वर्या नारकरला' बघताना खरच पालीचीच आठवण यायची, पाल बघा आपण कुठल्याही बाजुने बघितले तरी आपल्याकडेच बघत आहे असे वाटते, अगदी तसेच हि ऐश्वर्या नारकर कुठुनही बघा कॅमेर्‍याकडेच बघत असते. कवितेचे शिर्षक आवडले ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

अश्विनि३३७९ Sat, 03/14/2009 - 11:24
वा वा मस्त !! कालच घरात पाल आली होती .. पण असा कल्पना विलास नाही सुचला

क्रान्ति Sat, 03/14/2009 - 14:45
त्या बिच्चा-या पालीला कळत तरी असेल का आपण इतक्या साहित्यिकांच्या प्रतिभेचा विषय आहोत? काही म्हणा कविता छान जमलीय. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लिखाळ Sat, 03/14/2009 - 14:56
कडाडल्या वीजा थरारली धरणी चक्क चक्क चक्क चक्क, आवाज भिंतीवरून चक्क चक्क चक्क चक्क, आवाज ट्यूबमागून वाहवा .. एकदम मस्त ! :) सुपाल पण मस्त :) -- लिखाळ.

भडकमकर मास्तर Sat, 03/14/2009 - 14:57
खूप थरकापदायिनी कविता... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत Sun, 03/15/2009 - 04:27
यॉनिंग डॉग ! लगे रहो !! :-) "सुपाली" च्या या सुस्तोत्रात कुसुमाग्रजांच्या "अहिनकुल" आणि ग्रीष्मावरच्या कवितेची खिल्ली सुद्धा जाताजाता उडवलेली आहे ! अवांतर : याच्या डोक्याचे झाकण उघडले तर केवळ किडे वळवळत असतील असे पूर्वी वाटायचे. आता पालीसुद्धा ! राम राम ! ;-)

नाना बेरके Sun, 03/15/2009 - 11:43
म्हणून आवडली. आमच्या लहानपणी अशाप्रकारच्या म्हणजे - प्राणी, पक्षी, निसर्ग, माणसा-माणसातली नाती इ. विषयांवरच्या कविता खूप असंत. त्यामुळे पाठ्यपुस्तकवाल्यांना कविता मिळायला फारशी अडचण भासंत नसे. त्याकाळात "स्व " विषयाच्या म्हणजे - मी, ती, प्रेम, भावना ( फक्त तिच्या / त्याच्या ) इ. कविता फारश्या नव्हत्या, कारण माणसं खरंखुरं प्रेम करीत असंत आणि भावनाही जपंत असंत.

सहज Mon, 03/16/2009 - 07:23
मस्त! जृंभणश्वान अजुन येउ देत. आपले लिखाण नेहमीच आवडते.

In reply to by सहज

अनिल हटेला Mon, 03/16/2009 - 07:27
उत्तम महाश्वेता !! :-) आवडली !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..