आभार मिपा व मिपाकरांचे
मिसळपाव आणी मिपाकरांचे चे आभार कसे व्यक्त करु अस प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता आणी डोक्यात ही कल्पना आली.
रुक्ष वाळवंटात जसा सापडावा अमृताचा झरा
तशी मराठीची तृष्णा शमे मिसळपावच्या घरा
मराठमोळ्या माणसांना फक्त मिपाचाच आधार
मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!!
काव्य, चर्चा, साहित्याचा अनमोल असा ठेवा
संगे कौल,कलादालन आणी पाककृतींचा मेवा
लहानथोरांसाठी हे मराठीचे अक्षय भांडार
मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!!
कोणी न वाटे इथे परके जरी आले कधी प्रतिसाद तिरके
भावाबहिणीचे गोड भांडण, तसे एखाद्या काव्याचे विडंबन
किती आपुलकी, जिव्हाळ्याची इथे बहार
मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!!
चुकुन कुठे कंपुबाजीची तक्रार, कधी तंटा संधी न मिळाल्याचा
हीच तर खरी चवदार मिसळ, लुटा आनंद ह्या आस्वादाचा
आपल्याच भावंडांवर कशाला हवा आक्षेप
अरे मिपा तर आपलेच आभाळ, घ्या गरुडाची झेप
मिपाकंटकांसाठी मात्र उसळावी भवानीची तलवार
मिपाकर, तुझे लक्ष लक्ष आभार!!
तात्या, नीलकांत, लिखाळ, प्राजु,राघव, सामंत, केशवसुमार, क्रांती, देव, घाटपांडे, खराटा, चतुरंग, अवलिया आणी परा
मिपाकर बंधुंनो सर्वांची नावे लिहु नाही शकलो, राग आला तर क्षमा करा :)
मराठीच्या बाळगोपाळांचे सुखसमृद्ध असे हे घरदार
मिपा आणी मिपाकरा, तुझे लक्ष लक्ष आभार!!
तात्या अभ्यंकर रचिले पाया,
मिपाकर झालासे कळस...!
(माझ्यातला कवी हा सहा-आठ वर्षांनी कविता लिहायचा प्रयत्न करतोय त्यामुळे कवितेतल्या चुकांना क्षमा करा)
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
वाचने
4768
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
कविता
प्रयत्न चांगला आहे.
In reply to प्रयत्न चांगला आहे. by प्रमोद देव
लेख
मस्त
कविता छान
In reply to कविता छान by सौरव जोशी
तुमचा
मराठमोळे
In reply to मराठमोळे by विसोबा खेचर
धन्यवाद
कविता आवडली
आशय आवडला
In reply to आशय आवडला by सहज
+१
In reply to +१ by अवलिया
+२
मनातलंच बोललात.
मराठमोळे
आवडली कविता
वा छान
मोकळी कविता
छान
भारी आहे....
मस्त रे मराठमोळ्या !!
कविता