तुम्हाला आपारपी, लिंगोरच्या, रूमाल पाणी, डब्बा ऐसपैस, ईश्टोप पलटी शब्द आठवतायेत?
काल श्रीहरीकडे पावभाजीसोबत गप्पागोष्टी सुरु होत्या. गप्पात बालपणातल्या खेळांचा विषय आला. कर्मधर्मसंयोगाने आभासी दुनियेतल्या मिमिवर देखील त्याच गप्पा रंगल्या होत्या.
Hide and Seek म्हणजे लपाछपी हा तर राष्ट्रीय खेळ असल्यासारखा फेमस. अजूनही तितकीच बालप्रियता टिकवून आहे. आपल्या वेळेला डबा ऐसपैस् होतं. करवंटी, डवा लांब फेकायचा, तो आणेपर्यंत आपण लपायचं.
गल्लीत देवीच मोठ मंदिर,. नवरात्रीत संपूर्ण गल्लीत मांडव टाकलेला असतो. त्या वेळी खांबखांबोळी पेश्शल. खांब असणाऱ्या देवळात कधी ताकतुंबा खेळलाय? तसंच झाड पकडून ? प्रत्येकाने खांब पकडून उभा रहायचे आणि एकावर राज्य. ज्याच्या वर राज्य आले आहे, त्याने प्रत्येक खांबासमोर जाउन ताकतुंबा म्हणायचे. तोपर्यंत बाकीच्यांनी पळत एकमेकांच्या खांबाला पकडायचे. या गडबडीत ज्याच्यावर राज्य आले आहे, त्याने खांब पकडला तर जो मधे सापडेल त्याच्यावर राज्य. असाच अजून एक डोंगर-पाणी , डोंगर का पाणी मध्ये खांब नसून उंच भाग आणि सखल भाग असायचा.
ते पाटावर चौकोन आखुन चिंचोके झेलायचा खेळ, चल्लस ! दुसरं नांव काचकवड्या. चिंचोके आणि फ्लास्टिकची बटणं हि आणखी धमाल. त्याला चल्लस असेही बोलतात. काही पाच घरे, काही सात घरे तर काही बारा घरांचीही असल्याचे ऐकून आहे.
लोखंडी रिंग , सायकलच्या चाकाची चकारी , पुठ्ठे खोक्यांपासून बनवलेल्या मोटार गाड्या, त्यांना लावलेली जुन्या स्लीपर्स कापून बनवलेली चाके, या गाड्या सजवायला घोटीव कागद, थोड्या अडवान्स स्टेजवर गट्टू सेल अन् वायरी जोडून दिवे देखील बसवायचो गाडीला.
सूरपारंब्या खेळलंय का कोणी? वडाची झाडे आता दुर्मिळ. तेव्हा देवीच्या मंदिरात वडाच भलं मोठ्ठ झाड होत. खऱ्या पारंब्या असलेल्या वडाच्या झाडावर सूरपारंब्या खेळायला जाम मज्जा यायची. असाच आणखी एक खेळ म्हणजे डाँकी. विटांनी रस्त्यावर चौकोन आणि मधे रेघा ओढून चार भाग करायचे. ज्याचा वर राज्य तो फक्त या रेघांवर पळणार. त्याचा चुकवून चारही चौकोनात जाऊन यायचे. हा खेळ विशेषतः वाहतुक बंद झाली कि रात्री खेळायचो.
अप्पारप्पीला अपारंपारिक चेंडूला प्राधान्य. चिंध्या, मोजे (आता कुणी म्हणतच नाही) हे वापरून बनवायचा हा चेंडू . आबाधुबी, लगोरी, निंगोरच्या तसे राकट खेळ. कापडी चेंडूवर खेळले जायचे गल्ली क्रिकेट. शेवरीच्या काड्यांचे स्टंप, कधीकधी कचाकड्याच्या नाहीतर रबरी बॉल पण असायचा.
सिझनल खेळ म्हणजे, पावसाळ्यात गजाचा तुकडा घेऊन रपारपी, गज चिखलात रुतवायचा, काठी दगडावर् ठेऊन राज्य घ्यायला लावायचे, डॉज बॉल हा शाळेतला राष्ट्रीय खेळ, एकाचवेळी इतके बॉल उडायचे कि काय सांगु. शाळेला स्वतंत्र पटांगण नव्हत. मधल्या सुटीत हत्त्तीची सोंड खेळायचो. साखळी करून एक एक भिडू टिपायचा. आउट झालेला साखळीत जोडला जायचा. झटापटी, विष अमृत, शिवाजी म्हणाला हे देखील लोकप्रिय खेळ होता.
कोया खेळलंय का कुणी? कापडी बॉल, कोयबा अन त्यावरचा जुगार्, देढ,चौकोन्. सोरट हा आणखी एक जुगाराचा प्रकार पाहिला आहे. या जुगार शब्दापायीच कदाचीत तेव्हा घरी पत्ते खेळू देत नव्हते. अजूनही जोड पान सोडला तर पत्याचा एकही डाव मांडता येत नाही. बदाम सात, रमी, मेंढी कोट हे चढत्या भाजणीने आजही अगम्य आहेत. गोट्या, पतंग अन् विटी दांडू देखील असेच अकारण हुकलेले खेळ.
वाचने
6042
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
गोट्या पत्ते खूप खेळलो..
नॉस्ट्याल्जीक केलं राव तुम्ही
मस्त धागा!
In reply to मस्त धागा! by यशोधरा
तो खांबवाला खेळ पण, पण त्याला
सर्व खेळ खेळलोय लहानपणी
In reply to सर्व खेळ खेळलोय लहानपणी by बबन ताम्बे
मी 'एरियातला चॅम्पियन' होतो.
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र
In reply to अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र by अभ्या..
आगागा
In reply to आगागा by vcdatrange
हे सगळं बनवले आहे
In reply to हे सगळं बनवले आहे by नाखु
दामुके - शेळीच्या लेंडीत
>>जवारीच्या दिवसात
एकलम खाजा ...वरून एक लेक आठवला....
आम्ही तर बैल, बैलगाड्या
आम्ही अभ्यासू क्याटेगरी
In reply to आम्ही अभ्यासू क्याटेगरी by तुषार काळभोर
गोट्या खेळलो नसलो तरी राज्य
वर्गात बेंचवर पेनफायटर कोण
In reply to वर्गात बेंचवर पेनफायटर कोण by आनन्दा
जॉली
In reply to वर्गात बेंचवर पेनफायटर कोण by आनन्दा
दोन रुपयाचा स्टिक पेन?
बऱ्याच आठवणी ताज्या झाल्या.
राम लक्ष्मण सीता
आमच्या कोल्हापुरात
आकरा टोकरा...