मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घोरपड

शरदिनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अज्ञाताच्या अंधारात प्रतिभेची घोरपड घेऊन सर करतेस प्रसिद्धीचा कोंढाणा गड आला पण घोरपडीचे काय? काही म्हणतात, घोरपड ही तर दंतकथा कोणी म्हणतं , ते तर प्रतीक, चिवट जीवननिष्ठेचे म्हणून सांभाळ गं आपापली असलेली आणि नसलेली घोरपड कारण किल्ले येतील आणि जातील पण तेवत राहील , फुलत राहील मनामनात ... एक घोरपड

वाचने 3806 वाचनखूण प्रतिक्रिया 7

लिखाळ 13/03/2009 - 17:57
छान.. पण घोरपड प्रसिद्धीचा किल्ला सर करण्यासाठी वापरली असता ती चिवट जीवननिष्ठेचे प्रतिक कशी असेल? हे काही पटले नाही. घोरपड ही चिवट प्रसिद्धीलोलूपतेचे प्रतिक ठरेल. तसेच घोरपड मनामनांत श्वास घेईल, नख्या रुतवून ठाम राहिल हे समजण्यासारखे पण तीचे फुलणे, तेवणे ही निवड सुसंगत वाटली नाही. प्रामाणिक मत, राग नसावा. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

शरदिनी 13/03/2009 - 18:00
आपल्याला छान वाटली कविता म्हणून धन्यवाद... निवड सुसंगत वाटली नाही. तोच प्रयत्न होता.. मला सुसंगतीचाच कंटाळा येतो... मग जसे विसंगत सुचते तेच फायनल असते...

In reply to by शरदिनी

लिखाळ 13/03/2009 - 18:04
हे उत्तम :) या कवितेत आधीच्या कवितेतल्या सारखे शब्दवैचित्र्य नाही.. घोरपड असे शीर्षक पाहिल्यावर पटकन पान उघडले म्हटले की बरेच जोडशब्द दिसतील.. :) या कवितेत दोन शब्दांना जोडणारा दोर शेलारमामाने कापला होता का :) -- लिखाळ मालूसरे :)

In reply to by लिखाळ

धनंजय 13/03/2009 - 21:36
कविता आवडली. पण तेवणार्‍या-फुलणार्‍या घोरपडीच्या विसंगतीने माझ्या आस्वादाचे रसपोषण झाले नाही.

सुवर्णमयी 18/05/2009 - 02:11
वा! कविता अतिशय आवडली. घोरपड म्हटले की तिने घट्ट पकडणे इत्यादी हे फार परंपरागत विचार आहेत.. ते चुकीचे नाहीत. नेहमी तशीच अपेक्षा करण्याचे कारण नसावे. पण त्याच्याकडे एका नव्या दृष्टीने नक्की बघता यावे.