सीमारेषा
लेखनविषय:
काव्यरस
आहे आणि नाही यांच्या
सीमारेषेवर जगणे तसे
फार अवघड असते गं
------
श्वासाइतकीच सवयीची
झालेल्या तुझ्या आणि
माझ्यातील अंतर
आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे
एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही
आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित....
आहे आणि नाही यांच्या
सीमारेषेवर जगणे
फार अवघड असते गं
-------
सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात
तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात
कटलेल्या पतंगामागे धावण्यार्या मुलासारखा
मीही त्यांचा पाठलाग करत राहतो
मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय
त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय
आता चंद्र आणि पतंग यात
निवड करणे आले,
पण चंद्रही हाताला लागत नाही अन्
तो पतंगही...
खरचं, आहे आणि नाही
यातील सीमारेषा जिवघेणी असते गं
-------
आजकाल
तू सोडून दुसरे विषय नसतात
आणि तुझे विषय अथांग असतात
-------
काळ्याभोर डोळ्यांत
तू नेहमी एक हलकी स्मितरेषा
घेऊन वावरायचीस
अजूनही तेच डोळे
तुझ्या कपाटावरच्या आरश्यात
दिसतात, पण ती स्मितरेषा..
ती धूसर झाली आहे
आहे कि नाही?
हम्म.. आहे आणि नाही यातील
सीमारेषा फार जीवघेणी असते गं!
------
एकदा सांगून टाक
अजूनही तू तशीच
स्मितरेषा घेऊन वावरतेस?
आहे आणि नाही यातल्या
सीमारेषेवरची!!
------
आहे आणि नाही यांच्या
सीमारेषेवर जगणे तसे
फार अवघड असते गं
|-मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२०/०३/२०१३)
वाचने
6880
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
:)
दिल खुष कर देते हो आप...!!! :-)
कटलेल्या पतंगामागे धावण्यार्या मुलासारखा
मीही त्यांचा पाठलाग करत राहतो
मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय
त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय
आता चंद्र आणि पतंग यात
निवड करणे आले,
पण चंद्रही हाताला लागत नाही अन्
तो पतंगही...>>> 

In reply to दिल खुष कर देते हो आप...!!! by अत्रुप्त आत्मा
+१
आवडली कविता.
पहिल्या कडव्यातच गुरफटतेय पुन्हा पुन्हा!
शब्द काही जीवघेणे..
अप्रतिम.
__/\__
आपण तर मिकाच्या कवितांची फॅन आहोत बॉस्स.
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गंतहेदिलसे आवडली आहे :)
तू सोडून दुसरे विषय नसतात:)
In reply to तू सोडून दुसरे विषय नसतात by नगरीनिरंजन
इंडीड. :)
मिका,
जास्त त्रास नका करुन घेऊ! :)
कविता पटली नाही. 'पाष्ट इज पाष्ट' म्हणून सोडून द्या झालं! ;)
-प्यारेकाका
मस्त आहे!
एकदा सांगून टाक
अजूनही तू तशीच
स्मितरेषा घेऊन वावरतेस?
आहे आणि नाही यातल्या
सीमारेषेवरची!!
---आवडली :)
पहिले कडवे विशेष आवडले. मिका इज मिका.
खूप आवडली कविता !!
श्वासाइतकीच सवयीची झालेल्या तुझ्या आणि माझ्यातील अंतर आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित....हे खासंच !!
मस्त रे मिका. संदिप-सलिल च्या एका गाण्यातले पुढचे हे शब्द तुझ्या कवितांच्या बाबतीत अगदी चपखल बसतात. तुझ्या कविता वाचताना - 'असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा' - असा अनुभव नेहमीच येतो.
अशा आहे आणि नाहीच्या सीमारेषेवर जगण्याचा अनुभव घेतलाय त्यामुळे संपुर्ण रचना थेट आतपर्यंत पोहचलीय.
आपण जे न देखे मध्ये येतो ते खास सिलेक्टेड लोकांसाठी..त्यातलेच तुम्ही एक!
"अशा आहे आणि नाहीच्या सीमारेषेवर जगण्याचा अनुभव घेतलाय "
मी ही घेतलाय.. रडायचं नाही असं स्वतःला समजावलं, तरी रडू कोसळलच, प्रतिसाद देणार नाही ( अशी कविता लिहिल्याबद्दल तुमच्यावर रागवून :) ) तरी दिलाच.....
अवघडे बाबानु ! :-/
अप्रतिम ! ! !
थेट काळजाला भिडलि ! ! !
नेहमीप्रमाणेच!
अप्रतिम कविता.
:)
क्या बात मिका!!
डोळ्यात पाणी आलं हो...
आवडली सीमारेषेची कल्पना. :-)
अवांतर:
सीमारेषेवर जगणे या कल्पनेवरून लेडीहॉक : https://en.wikipedia.org/wiki/Ladyhawke_(film) या सिनेमाची आठवण झाली!
साला, या मिकाच्या कविता केव्हाही आणि कितीही वेळा वाचल्या तरी आवडतातच
रच्याकने :- हा गृहस्थ सध्या आहे कुठे?
पैजारबुवा,
(No subject)