रफाल - भाग २
प्रश्न ११ – ToT तंत्रज्ञानाचे हस्तांतरण रफाल करारातून का वगळले गेले.
उ ११ – ToT वगळल्या शिवाय वाटाघाटी पुढे सरकत नव्हत्या. जर पुढे सरकणाऱ्या असत्या तर २०१२ मध्येच यूपीए सरकार असताना तो करार झाला असता. २०११ साली सगळ्यात कमी बोलीवर व बाकीच्या निकषांवर रफालची निवड होऊन सुद्धा २०१५ पर्यंत ToT मुळे वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचू शकल्या नाहीत ह्याचाच अर्थ हे कलम जर असच कायम ठेवले असते तर अजून पर्यंत वाटाघाटी पूर्ण झाल्या नसत्या व करार झाला नसता. ह्या कराराचे प्राथमिक उद्दिष्ट वायुसेनेच्या लॉंगटर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे त्यांना MMRCA विमाने उपलब्ध करून देणे होते, ToT हे जाता जाता जमले तर चांगलेच असे दुय्यम उद्दिष्ट. प्राथमिक उद्दिष्टच जेथे रखडले व पुरे होत नाही असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्टावर नजर लावून बसण्यात काय अर्थ आहे. आणि जर दुय्यम उद्दिष्ट साध्य करायच्या नादात प्राथमिक उद्दिष्ट संपुष्टात येत आहे असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्ट प्राप्त होण्यात काही अर्थ नाही. ह्याच दृष्टिकोनातून ते वगळले गेले. नाही तर विमाने आली नसती व ती येत नाहीत म्हणून ToT पण झाले नसते.
प्रश्न १२ – रफाल ची किंमत सार्वजनिक का करत नाहीत. किमतीची चर्चा का होऊ देत नाही. करारात सुरक्षे संबंधीत कोणते कलम आहे की जेणे करून त्याची किंमत सार्वजनिक होऊ शकत नाही.
उ १२ – प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. शस्त्र – त्याला तोड. त्या तोडाला तोड. हे सगळे जे कमी वेळात करू शकतात ते जिंकतात. सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो.
प्रश्न १३ – अंबानींना विमान बनवण्यात अनुभव आहे का.
उ १३ – त्यांनी पिपावाव कंपनी विकत घेतली जी बरीच वर्ष डिफेन्स प्रॉडक्शन मध्ये होती. बाकी कंपनी कशी आहे ते दासू ने जाणून घ्यायचे त्यांचा निकष महत्त्वाचा ऑफसेट त्यांनी फेडायचे आहे.
अंततः - मी हा लेख लिहिण्या मागचे उद्दिष्ट असे की वर्ष २००१ पासून रक्षा संपादन हे मन मानेल तसे कसे ही होत नाही तर त्या संपादना मागे एक कायदेशीर प्रक्रिया उभारली गेली आहे. ती प्रक्रिया पारदर्शक बनवण्याच्या धोरणातून निर्माण झाली आहे. आता ती पूर्वी सारखी भ्रष्टाचाराला चारा घालणारी राहिली नसून त्याला आळा घालणारी झाली आहे. अंतर सरकारी करार अशा प्रक्रियेला अजून मजबुती देतो, जिथे भ्रष्टाचारी लोक नाही तर थेट आपले सरकार दसर्या सरकारशी बोलून काय पाहिजे ते विकत घेते.
हा लेख विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर विश्वास बसू शकेल. प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे. जे काही नेते व काही पक्ष अपप्रचार करून विश्वास तोडण्याचे काम करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या भवितव्याच्या व पक्षाच्या अस्तित्वाच्या संभ्रमातून उद्भवलेली त्यांची गरज आहे व त्यामुळे वास्तव बिघडवण्याचा प्रयत्न आहे.
मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे.
तिसरा भाग लवकरच –
(क्रमशः)
In reply to काही प्रश्न by आनन्दा
In reply to त्या फोटोमध्ये बघितले तर by आनन्दा
In reply to काही प्रश्न by आनन्दा
In reply to प्रश्व विचारलात का उत्तर दिलत by रणजित चितळे
In reply to रिलायन्स ला "तंत्रज्ञान by सुबोध खरे
In reply to रिलायन्स ला "तंत्रज्ञान by सुबोध खरे
रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ?परफेक्ट. मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने गव्हर्नमेंटला रोडरोलरहि विकले. परदेशातून आणि खाजगी कंपन्याकडून घेऊन. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने बसबॉड्या पण विकल्या हरयाणा आणि दिल्ली सरकारला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने विमाने पण इंपोर्ट केली आणि भारतात विकली. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. भारतात सार्वजनिक वाहतूक सेवांची जास्त गरज आहे असा अहवाल असताना छोट्या कारची निर्मीतीचा परवाना मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. इतर छोट्या कारच्या निर्मीतीत गुंतलेल्या उद्योजकांना शांत करण्यात आले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. काहिहि अनुभव नसता प्रोटोटाइप पण सादर करणे जमले नाही तरीही मारुतिला सर्वत्र हिरवा कंदील मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिच्याच नावाखाली कित्येक कंपन्या स्थापन करुन एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या नावाने पैसे फिरवत अपहार केले गेले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. कित्येक एकर मोक्याची अन सुपीक जागा कवडीमोल किंमतीत मिळवली गेली. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. हा इतिहास झाला. . नंतर एखादी सुझुकी येते, नशीबाने सगळे तारुन नेले जाते, तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळत जातो, गाड्यावर सुझुकीचा लोगो दिमाखात मिरवला जातो. हे झाले वर्तमान. पण मारुतिचा पाया असाच एककल्ली व्यक्तिकेंद्रित आणि काहीच जणांचे भले करणारा होता, भविष्य मारुति सुझुकीप्रमाणेच असेच असेल असे म्हणता येणार नाही.
In reply to परफेक्ट by अभ्या..
In reply to मारुति पंतप्रधानाच्या मुलाची by सुबोध खरे
बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात.डॉक्टरसाहेब, अॅक्चुअली तुम्ही म्हणालात ते वाक्य अगदी खरे ठरतेय बघा. तुमच्याच बाबतीत. चष्मा घातला की असंच होतंय. हे स्पष्ट वाक्य आहे माझ्या प्रतिसादातले
मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच.
अजुन काय स्पष्ट सांगावे, बाकी प्रतिसादात मारुतिने काय केले तेच लिहिलेले आहे, त्यात कुठेच मारुति गौरवाचा भाग नाहीये, तुमचाच प्रतिसाद कोट करुन त्यासंदर्भातच लिहिलेले आहे, पण एकदा मोदीप्रेमाची परमनंट लेन्स बसली की सगळ्यांच्याच डोळ्यावर चष्मे आहेत असा भास व्हायला लागतो. निदान प्रतिसाद तरी नीट वाचत जा. तुमच्याविषयी, तुमच्या ज्ञानाविषयी आदर आहे पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा.In reply to अर्रर by अभ्या..
In reply to मोदी प्रेमाचा येथे कुठे भास by सुबोध खरे
In reply to मी फक्त श्री मोदींना पोकळ by मार्मिक गोडसे
In reply to धन्यवाद by स्वधर्म
In reply to धन्यवाद by स्वधर्म
In reply to धन्यवाद by स्वधर्म
In reply to स्वधर्म - नमस्कार by रणजित चितळे
In reply to स्पष्टीकरण by स्वधर्म
In reply to धन्यवाद by स्वधर्म
In reply to पण तरी सुद्धा वाटाघाटी by मार्मिक गोडसे
In reply to हि अरुण जेटलींनी by माहितगार
In reply to तसं असेल तर जेटलींनी by मार्मिक गोडसे
In reply to जेटली by नाखु
In reply to तसं असेल तर जेटलींनी by मार्मिक गोडसे
In reply to अरुण जेटलीं कसलेले वकील आहेत, by माहितगार
In reply to पण तरी सुद्धा वाटाघाटी by मार्मिक गोडसे
In reply to सध्या by मार्मिक गोडसे
तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का?
-
मला वाटते, या लेखाच्या मार्फत चितळे सरांनी कोणतीही गोपनीय माहिती सार्वजनिक केलेली दिसत नाही.[पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे] लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेतIn reply to तुम्ही तिथे कामाला असाल तर by प्रसाद_१९८२
In reply to लेखातील हे त्यांचे वाक्य, by मार्मिक गोडसे
In reply to सध्या by मार्मिक गोडसे
In reply to सध्या by मार्मिक गोडसे
In reply to सध्या by मार्मिक गोडसे
In reply to रफाल करार by रणजित चितळे
In reply to ओके. दोन्ही किंमती गोपनीय by मार्मिक गोडसे
In reply to गोडसे साहेब by रणजित चितळे
In reply to चितळे साहेब by सुबोध खरे
In reply to https://www.misalpav.com by सुबोध खरे
In reply to गोपनिय by SHASHANKPARAB
In reply to ओ by इरसाल
In reply to एकंदरीत भाजप ची राफेल विमान by अभिजित - १
In reply to अर्थात.. by आनन्दा
In reply to अर्थात.. by आनन्दा
In reply to मी फक्त किंमत विषयी बोलत आहे. by अभिजित - १
In reply to हांगं अश्शी... सौ सुनारकी आनी by गब्रिएल
In reply to एकंदरीत भाजप ची राफेल विमान by अभिजित - १
In reply to Orders dry up, HAL staff could sit idle by अभिजित - १
In reply to ओपन आणि स्ट्रेट बोलतो.. by आनन्दा
आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे
नंतर मिळाले तरीही बरेच नाही का ? कधीच न मिळण्यापेक्षा ?
अंबानीच्या 3000 कोटी मध्ये
फक्त ३००० कोटी ? तो सांगायचा आकडा आहे .. राफेल डील कॉस्ट किती आहे ते एकदा बघा .. In reply to Orders dry up, HAL staff could sit idle by अभिजित - १
In reply to खूप छान मुद्देसूद अपोलोजेटिक by नगरीनिरंजन
In reply to झालं by नाखु
In reply to झालं by नाखु
In reply to तात्पर्य by मराठी कथालेखक
In reply to तात्पर्य by मराठी कथालेखक
In reply to तो रागा एक मुर्ख माणूस आहे by सुबोध खरे
गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेतखरं आहे.. रागा मुर्ख आहे आणि त्याला बाजूला सारण्याचं धाडंस बाकी काँग्रेसजनांत अजूनतरी नाही म्हणूनच इतरांच फावतंय... ते असो. पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे... २०१९ .. नाही तर २०२४ ला तरी "अब की बार pc सरकार !! ...."
In reply to गम्मत म्हणजे सगळेच भारतीय by मराठी कथालेखक
पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे
असं प्रकटपणे म्हणून तुम्ही पृ. चव्हाणांचे अभितव्य धोक्यात आणत आहाते, हे आपल्या ध्यानात आले काय ? पंतप्रधानपद सोडाच, आजपर्यंत 'कॉग्रेसच्या पक्षाध्यक्षाच्या पदासाठी निवडणुकीला उभे राहणार' अशी नुसती इच्छा व्यक्त केलेल्या भल्याभल्यांची काय अवस्था झाली आहे, हे विसरलात ?! =))In reply to पृथ्वीराज चव्हाण भारताचे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ना खु साहेब by सुबोध खरे
In reply to सरकारने by रणजित चितळे
In reply to रिलायन्सला फक्त ८५० कोटीचे by सुबोध खरे
In reply to तो सुद्धा ५१ टक्के अंबानी व ४९ टक्के दासू by रणजित चितळे
In reply to ऐका खुद्द घोड्याचा तोंडून आणि by डॉ सुहास म्हात्रे
अतिशय माहितीपूर्ण लेख.