Skip to main content

नवरंग - भोंडला

लेखक नूतन यांनी गुरुवार, 18/10/2018 या दिवशी प्रकाशित केले.
'ताई, तुमच्या मोबाईलमध्ये बघून सांगा ना उद्याचा रंग!' माझ्या कामाच्या मावशींची ही मागणी मी वॉट्स अ‍ॅप उघडून पूर्ण केली. त्याचबरोबर मनात विचार आला की खरच,'म. टा. 'नवरंग आणि भोंडला हे मुंबईकर भगिनींच्या रक्तातच भिनलं आहे. अगदी कामवाली पासून ते कॉर्पोरेट जगातील प्रत्येकीला 'नवरंगात'रंगायचं असतं. दुकानदारांची धन करायची, दुसरं काय! इथपासूनं अमूक रंगाची साडी आणली नाही तर नवर्‍यांचं काही खरं नाही या सारखे वॉट्स अ‍ॅप विनोद, घर आणि ऑफिस मधील कामाचा भार या कशाचीही पर्वा न करता या सार्‍या जणी हौसेने 'नवरंगी नवरात्र'साजरं करतात. कारण हे छोटेछोटे आनंदच त्यांच्या मरगळलेल्या मनाला ताजंतवानं करतात. 'नवरंग'प्रमाणेच 'भोंडला'खेळायला घरी सवड नसली तरी कार्यालयात, लोकलच्या डब्यातही भोंडला रंगतो. खिरापती वाटल्या जातात. मग मी तरी मागे कशी राहू? माझा नवरंग - भोंडला सादर आहे पण 'पेपर क्विलींग'च्या माध्यमातून.......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7286
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

काही आवश्यक बदल केले आहेत, आता लॉग इन न करताही मला दिसत आहे. आपल्याला दिसतो आहे का?

चित्राला पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन त्याचा दुवा परत लेखात टाकला तर ते दिसेल. किंवा तो नवीन दुवा इथे प्रतिसादात ताकल्यास लेखात हलवता येईल.

In reply to by नूतन

प्रतिसादातला फोटो दिसतोय. छान आहे. तुमच्या धाग्यामुळे आमच्या सौभाग्यवतींना भोंडला केवळ ऐकून माहिती आहे, तिने प्रत्यक्षात बघितला नाहीये अजून हि नवीन गोष्ट समजली. :)