मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)

कुमार जावडेकर · · जे न देखे रवी...
काव्यरस
वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं! पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं! स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं! माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं! तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं... अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं! वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार! नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं! - कुमार जावडेकर

वाचने 2488 वाचनखूण प्रतिक्रिया 4

In reply to by प्रसाद गोडबोले

कुमार जावडेकर 02/09/2018 - 11:49
ही आपण उल्लेखलेली व्यक्ती कोण आहे हे मला माहिती नाही, पण हे 'मला उमजलेलं झुमरू' असं मी म्हणेन.

तुषार काळभोर 02/09/2018 - 17:40
दिल यॉडल यॉडल हो गया