गर्भार सातव्या महिन्याची
लेखनविषय:
काव्यरस
जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!
मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!
क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!
आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!
- संदीप चांदणे
वाचने
12152
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
=))))))
वास्तववादी कविता!!
=))
लै भारी
:D:D:D:D
कविता आवडली...
=))
बाकी सर्व ठीक आहे....
In reply to बाकी सर्व ठीक आहे.... by तुषार काळभोर
त्यामागे मोठा मिपा-इतिहास आहे
In reply to बाकी सर्व ठीक आहे.... by तुषार काळभोर
हा...हा...
In reply to हा...हा... by चांदणे संदीप
=)))
=))
आपलीच
लय भारी
हा हा हा. भारी लिवलय. ;-)