रानभाजी - पेव च्या पानांची भजी
पावसाळ्यात पेवची ओसाड जागी बरीच झाडे उगवलेली दिसतात.पेवचे कंद असतात. त्याला कालांतराने सुंदर पांढरी फुले येतात. पेवची रोपे कोवळी असताना त्याची भाजी व भाजी करतात.
साहित्यः
पेवची कोवळी पाने
बेसन १ वाटी
पाव चमचा हिंग
१/२ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
थोडी धना-जिरा पावडर (नसली तरी चालते)
गरजेनुसार मीठ
तळण्यासाठी तेल.
१)पेवचे उगवलेले रोपटे.
२) पाने
३)
पाककृती:
वरील तेल व पाने सोडून सगळे साहित्य एकत्र करावे व थोडे थोडे पाणी टाकून इडलीच्य पिठाप्रमाणे पीठ भिजवावे. त्यात धुतलेली पाने बुडवून घ्यावीत.
बुडवलेली पाने गरम तेलात सोडावीत.
पाने खालून थोडी शिजली वाटली म्हणजे रंग बदलला कि झाऱ्याने पालटावीत.
आता बुडबुडे कमी झाले पाने आत जाऊ लागली कि भजी काढावी. तयार आहे पेवची भजी
महत्वाची टिपः कोणतीही रानभाजी ओळख पटल्याशिवाय घेऊ नये.
२) पाने
वाचने
16727
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मस्त.
मस्तं दिसत आहेत ! आमच्या घरी
बाब्बो !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जिंदगी में पेहला पेहला तूने मुझको प्यार दिया है... :- Mohabbat (1985)हे पेव कुठे मिळतं (बाजारात)?
In reply to हे पेव कुठे मिळतं (बाजारात)? by गवि
ही आणि अनेक प्रकारच्या
वा खूप छान ....
आम्हीही
मस्त भजी ! तोंडाला पाणी सुटले
जबरदस्त
पुईची पान
मस्त!
सगळ्यांचे मनापासून आभार.
मस्त रेसिपी
पावसाळ्यात पेवची ओसाड जागी
In reply to पावसाळ्यात पेवची ओसाड जागी by अनिंद्य
त्याचा संबंध जमिनीखाली माल,
In reply to पावसाळ्यात पेवची ओसाड जागी by अनिंद्य
अजिबातच नाही.
In reply to अजिबातच नाही. by राही
पुई
@ गवि,
रानभाजी महोत्सव २०१८
रानभाजी ४ थे वर्ष