वाया गेलेली कविता
लेखनविषय:
प्रहर चालला तो दुपारचा
त्यातून घन आलेले दाटून
दमट जराशी हवा पसरली
लपाछपी खेळतसे ऊन
दूर कुठे तो बसून रावा
घालीत होता किर किर शीळ
उदास होते आयुष्य झाले
सरता सरेना आजची वेळ
अशाच वेळी बसून एकटा
हळूच असे तो निरखत तिजला
एक भेंडोळे एक लेखणी
होता हाती घेऊन बसला
काही अंतरावर ती होती
घागर बुडवीत पाण्यामध्ये
रेखीव काया लवचिक बांधा
वर्ण गोमटा कपडे साधे
तिला ना होती जाणीव त्याची
गुणगुणतसे आपल्या तंद्रीत
आडोशास तो बसला होता
काही खोडीत काही लिहीत
घागर भरुनी ती निघताना
याची लेखणी थांबे पुरी
शीळ घालुनी तिज तो बोले
तुजवर लिहिले हे वाच सुंदरी
निघे गुलाब मग खिशातुनी
जशी ती एकेक ओळ वाचता
जरा थांबुनी मग ती वदली
"वा रे दादा छान कविता !"
गुलाब गेला सुकुनी खिशातच
ती लबाड हसली जाता जाता
गेली घेऊन भेंडोळेही
वाया गेली एक कविता
वाचने
6911
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
=))
कहर कविता ...
===
गुलाब गेला सुकुनी खिशातच
ती लबाड हसली जाता जाता
गेली घेऊन भेंडोळेही
वाया गेली एक कविता
त्यावेळेस कवीच्या चेहऱ्यावर नेमके कसे भाव असतील हे डोळ्यसमोर तराळले.
In reply to कहर कविता ... by विशुमित
धन्यवाद
प्रेमाचा गुलकंद कवितेसारखी वाटली. छान जमलीय कविता
वाया गेली तरी प्रतिभा उचंबळत असते आणि कवी नव्या जोमाने कामाला सुरुवात करतोच
पांथस्थ नाखु
In reply to कविता by नाखु
उचंबळणार्या प्रतिभेचे एक कवी आठवले. हल्ली ते फारसे लिहित नाहीत.
In reply to उचंबळणार्या प्रतिभेचे एक कवी by प्रचेतस
खी Ss क . सध्या ( 2 वर्ष ) तरी त्यांनी कुठलीशी वटिका , काढा घेतलाय जो त्यांना भलताच लाभदायक ठरलाय . त्यामुळे ती आलेली कळ जराशिक दाबून राहिलेय.
मला कविता हा प्रकार फारसा आवडत नाही, पण मजा आली हि 'वाया' गेलेली कविता वाचून.
मस्त आवडली.
हा.हा.हा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू...धन्यवाद
वारे दादा ! छान कविता लिहीली आहेस ! =))
=))
=))