श्री गणेश लेखमाला २०२४ - फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार
फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार
जगातील कुठल्याही समाजात काही गोष्टी सर्वसहमतीच्या असतात, तर काही गोष्टींबाबत दुमत असते. जगात जिथे जिथे मानवी समाज आहे, तेथे सत्ता, संपत्ती, स्त्री, जमीन आदी अनेक कारणांवर लोकांमध्ये वादविवाद असतात. या वादविवादात पूर्वी भांडणे आणि युद्धे होत आणि राजा तसेच राजघराणे बदलले जाई. औद्योगिक क्रांती आपल्याला मध्ययुगीन जगातून आधुनिक जगाकडे घेऊन आली. त्याबरोबर नवनवीन तंत्रज्ञान, विचारधारा, आयुष्याची नवनवीन मांडणी समोर येत गेली.
नवीन तंत्रज्ञान घेऊन नवीन बाजारपेठा शोधत असणाऱ्या युरोपात जगाची बाजारपेठ ताब्यात घ्यायची स्पर्धा लागली.
मिसळपाव