बिबट्या
मध्यंतरी south africa मध्ये johansburg बसून साधारण 500 km अंतरावर असणारं kruger national park ला जाण्याचा प्लॅन केला. माझा मित्र - अरुण राव ( काका च्या वयाचा असला तरी मित्रच) , तिथे गाईड आहे, तिथे सफारी पण तोच अरेंज करतो, माझी जयड तयारी झाली होती, 2 SLR, 500mm ,300mm वगैरे सगळं घेतलं आणि जोहान्सबर्ग ला थडकलो, अरुण आला होताच, त्या दिवशी जोहान्सबर्ग मध्ये मुक्काम करून सकाळी निवांत kruger ला जायला निघालो, संध्याकाळी hazyview नावाच्या छोट्या शहरात पोचलो,
दुसऱ्या दिवशी पास काढणे आतल्या बुकिंग चे वगैरे सगळे सोपस्कार करून सफारी सुरू केली, जिराफ, हत्तींनी दर्शन दिलं, पण मी एक स्वप्न घेऊन आलो होतो ते म्हणजे बिबटया चं दर्शन, कारण असं की wildlife फोटोग्राफी च्या छंदापाई भारतात अनेक वेळा सफारी करून पण मला ह्या अलौकिक सौंदर्य असलेल्या ह्या बिबट्याने प्रत्येक वेळा मला हुलकवणीच दिली होती, कधी अर्ध्या सेकंदाची झलक तर कधी फक्त पाऊलखुणा, त्याने मला इतक्या वेळ हुलकावणी दिली होती की त्याला डोळे भरून पहायचं आहे हे मी माझ्या बकेट लिस्ट मध्ये कधी टाकून दिले ते मलाही कळलंच नाही,
असं म्हणतात की बिबट्या जेव्हा तुम्हाला दिसतो तेव्हा त्याने तुम्हाला किमान 10 वेळा तरी बघितलेले असते, ठिपकेदार शरीर असल्यानं थोड्याफार झाडीत गेला तरी सहजासहजी तो दिसणे कठिणच, परत वाघासारखा दांडगा प्राणी पण नाही हा. बिबट्या तसा बराच adjusting nature चा प्राणी,त्यामुळे हा कुठेही आणि कसाही जगू शकतो त्यामुळे संख्या भरपूर पण दिसणे कठिणच. बिबट्याची body language म्हणाल तर आपल्या घरच्या मांजराच सक्ख मोठं भावंड शोभेल. मांजराला वाघाची मावशी म्हणण्यापेक्षा बिबट्याची सख्खी धाकटी बहीण म्हणलं पाहिजे, तर असा हा बिबट्या.
सफारी सुरू झाली पहिल्या दिवशीच एका ओढ्यातल्या दगडावर "साहेब" बसलेले दिसले पण खूप लांब होता तो, पण तरीही मी आणि अरुण ने दोघांनी फोटो काढले, पाहताना लक्षात आलं की तो बिबट्या दगडाच्या बाजूला झुडपात काहीतरी पाहतोय, काय असावे असं आम्ही म्हणतोय ना म्हणतोय तोच त्या झुडपातून मादी बिबट्या त्याच्या पुढ्यात दाखल झाली... yess ती mating pair होती, त्यानंतर नुसते नर आणि मादीच नाही तर त्यांच्या mating चे फोटो पण मिळाले, पण हे दोघे खूप लांब होते आणि सावलीत होते त्यामुळे खूप भारी फोटो नाही मिळाले पण एक दुर्मिळ दृश्य आज दिसलं यात समाधान होतं
दुसऱ्या दिवशी जंगलातील सगळ्यात जुनं झाड पाहण्या साठी जाताना अचानकपणे एक बिबट्या मादी बाजूच्या झुडपात जाताना दिसली, गाडी थांबवून मागे घेई पर्यंत कुणास ठाऊक पण अचानक पणे दिसली. रस्त्याला अगदी खेटून असलेल्या झुडपातच बसली होती, इतकी जवळ होती की आमच्या दोघांची नजरानजर झाली. ती पण बिचकलेलीच होती त्या वेळी ती मला अगदी आमच्या घरच्या मांजरासारखीच वाटली.इतक्या जवळून मी निसर्गात बिबट्याला कधीच पाहिलं नव्हतं, केवळ अप्रतिम!! हे सगळं असूनही माझ्यातला फोटोग्राफर चा हावरटपणा काही कमी होत नव्हता, मला अजून छान फोटो हवे होते.
तिसऱ्या दिवशी भरपूर फिरलो सगळे प्राणी दिसले पण बिबट्या नाही दिसला मी अरुण ला म्हणलं ओण की बिबट्या नाही दिसला आज.... त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला... त्याच्या त्या नजरेत , एवढं चांगलं सायटिंग झालं ना अजून किती हावरे पणा करशील असं स्पष्ट दिसत होतं, आणि मला ही ते माहीत होतं जंगलात गेलं की कधी काय दिसेल हे सांगता येत नाही आणि कधी अनेक दिवस भटकून पण काहीच दिसत नाही. पण मी माझी इच्छा का सोडू? पण माझं नशीब जोरावर होत,एक बिबट्या दिसला त्याने इम्पला हरणाची शिकार केली होती आणि ते छिन्न विच्छिन्न हरीण त्याने झाडावर नेलं होतं कारण खाली तरसं आली होती. बिबट्याच्या त्याने केलेल्या शिकारी सोबत फोटो मिळणे दुर्मिळच... मग मी अरुण कडे कटाक्ष टाकला, तो ही हसला,म्हणला काय नशीब घेऊन आला आहेस तू....
तो दिवस होता 7 सप्टेंबर दोन दिवस आधी क्रूगर मध्ये पाऊस झाला होता, थंडी वाढली होती, गार वारा वाहत होता, अशा थंडीत जंगल सुद्धा गराठतेच, प्राणी कमी दिसतात, त्यावेळी ही तसच झालं होतं विशेष असं काही ह दिसलं नव्हतं, आम्ही फक्त भटकत होतो काहीतरी छान दिसेल या आशेने, आणि..... अचानकपणे समोरच्या झाडावर बिबट्या झोपलेला दिसला असा की मला जशी पोझ हवी होती अगदी तस्सा.... मी ते सुंदर दृश्य पाहून शून्यातच गेलो,अनेक वर्षांच्या वाट पाहण्यानंतर जे दृश्य मला दिसत होतं ते म्हणजे मेजवानीच होती. भानावर येऊन मी फोटो काढले, किती फोटो काढू आणि किती नको असं झालं होतं, पण नंतर मी कॅमेरा बाजूला ठेवला आणि डोळे भरून त्याला पाहिलं आणि मनात साठवून ठेवलं.
अनेक वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न आज चक्क पूर्ण झालं होतं ...
5:45 वाजले होते 6 वाजेपर्यंत गेटवर पोचायला लागतं..... . अरुणनी गाडी वळवली, गाडीत शांतता होती मी निःशब्द झालो होतो, डोळ्यातून धारा लागल्या होत्या, अतिशयोक्ती नाही पण त्या वेळेस आयुष्याकडून काहीच अपेक्षा राहिल्या नव्हत्या, अगदी मृत्यू जरी आला असता तरी मी आनंदाने सामोरा गेलो असतो. आजवर इतकं तृप्त मला कधीच वाटलं नव्हतं..…पूर्णपणे तृप्त मनानी मी भारतात परतलो, ह्या बिबट्याच्या दर्शनाने मला एक वेगळंच समाधान दिलं, ते कसं ते मला शब्दात नीटसं सांगता येत नाहीये, समजून घेता आलं तर बघा.
-चिंतामणी
वाचने
19745
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटू दिसत नाय
दिसले, झकास एकदम
In reply to फोटू दिसत नाय by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सगळेच फोटो जबरदस्त !!!
मस्त
लक्की आहेस. झक्कास अनुभव..!
पुढचा धागा पेंटिंग बद्दल...
लवकरच करतो डोक्यात जवळजवळ
In reply to पुढचा धागा पेंटिंग बद्दल... by मोदक
झक्कास दिसताहेत बिबटे राव
सगळे फोटो कातिल आहेत.
Hobby आहे फोटोग्राफी ची
In reply to सगळे फोटो कातिल आहेत. by प्रमोद देर्देकर
मस्त फोटो!!
धन्यवाद!!
In reply to मस्त फोटो!! by अनिरुद्ध.वैद्य
जब्बरदस्त....
जब्बरदस्त....
छान...!
अप्रतिम लेख .सर्व फोटो
भारीच. शेवटचा फोटो पाहून
हायला..
In reply to भारीच. शेवटचा फोटो पाहून by एस
सुपर से भी ऊपर फोटो आहेत !
In reply to भारीच. शेवटचा फोटो पाहून by एस
थरारक लेखन, फोटो सुंदर !
जबरा आलेत फोटोज!!
मस्त आलेत फोटो. झकास लेख.
वॉव!
धन्यवाद
In reply to वॉव! by राघव
अप्रतिम सुंदर..
फोटो खुपच आवडले, लेख सुद्धा
धन्यवाद
In reply to फोटो खुपच आवडले, लेख सुद्धा by जेडी
फोटो फार सुंदर आलेत !
अप्रतिम अनुभव
व्वा! वाह व्वा!!