Skip to main content

रामोजी फिल्म सिटी बद्दल माहिती हवी आहे...!!

लेखक विशुमित यांनी गुरुवार, 13/10/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी..!! नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमच्या लग्नाच्या वाढदिवस प्रितेर्थ रामोजी फिल्म सिटी (हैद्राबाद) पाहण्याचा मानस आहे. नुसता मानस च नाही तर संकल्प सुद्धा सोडला गेला आहे. अर्थातच म्याडम साहेबानी ...!! अंतर जालावरती खूप पुनरावलोकन तपासली पण मनाचे समाधान नाही झाले. त्या बद्दल मिपा कर मंडळीं कडून खालील माहिती हवी आहे. ****सदस्य संख्या- प्रौढ 2 आणि 1 चिमुकली (वय वर्ष 2.5) ****वेळ- 2 रात्री 3 दिवस 1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची आहे. 2) फिल्म सिटी मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे (Do 's अँड Don't 's ) 3) आत मध्ये कोणत्या वयक्तिक वापराच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो आणि कोणत्या नाही. 4) फिल्म सिटी मध्ये राहण्याचा पर्याय ठीक आहे का बाहेर हैद्राबाद मध्ये राहिलेला बरं पडेल. 5) फिल्म सिटी व्यतरिक हैद्राबाद मध्ये एका दिवसामध्ये पाहण्या सारखा कोणती ठिकाणे आहेत. 6) सर्वात महत्वाचं हैद्राबादी बिर्याणी खाण्याची कोणती प्रसिद्ध ठिकाण आहेत? अर्थात आणखी काही स्पेशल खाण्याची ठिकाणे असतील, ते पण कृपया नमूद करावी. ###

वाचने 49323
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

रहायला हे कसे आहे ? http://www.countryclubhyderabad.com/ कॉन्फ्रन्स बंजारा हिलच्या एका हॉटेलात आहे. म्हणून रहायची व्यवस्था बंजारा हिलच्या जवळ हवी .

Birla Mandir, Chowmahalla Palace, Charminar, Mecca Masjid & Shopping at Laad Bazaar(By walk), Salarjung Museum(Lunch Break), Nizam Jubilee Pavilion(purani haveli), Golconda Fort, Qutub Shahi Tombs(Drive through), Lumbini Park -(Terminating point) हे एका दिवसात फिरून होऊ शकते का? साधारण किती वेळ लागू शकेल? हि इटिनेररी त्यांच्या ऑफिशिअल टुरिझम साईट वर दिली आहे. तसेच, २ व्हीलर रेंट करून फिरणे कितपत योग्य? आम्ही दोघेच आहोत. आणि कुठून रेंट करता येईल? या वीकेंडला जात आहोत..

In reply to by कंजूस

हो. तसाच आहे.. तुम्ही काय बदल सुचवाल ? आमचं आम्हीच फिरू.. आमच्या कडे फिरायला एकच दिवस आहे. सो, कोणती ठिकाणे एकदम मस्ट व्हिसिट अशी आहेत? शिवाय २-व्हीलर रेंट करून फिरता येत का?

Golconda Fort आणि Salarjung Museum

लुंबिनि पार्क, हुसेन सागर तलावाच्या उत्तरेस सिकंद्राबादकडे आहे. दक्षि्ण भागात अंज्जेया पार्क, आणखी एक पार्क आहे. सेक्रेटरिएटही जवळच आहे. आणि बुद्धाचा पुतळा तलावाच्या मध्यभागी आहे. संध्याकाळी एक क्रूज बोट फिरवतात, सर्वत्र लाइटिंग असते. फोटोमध्ये हे खुप छानछान वाटेल पण तलावात अतिशय दुर्गंधि आहे. आता डिसेंबरात गेलेलो. पाच वाजता पाहिला हा भाग. गटाराचे पाणी सोडून तलावाची वाट लावली आहे. बिरला मंदिर दक्षिण टोकालाच आहे. पण ही मंदिरे बय्ाच शहरांत आहेत. २) चार मिनार ,

) चार मिनार, चुडि बाजार, सालारजंग हे हुसेनसागरच्या दक्षिणेस आहेत. सालारजंग - दहाला उघडते, शुक्रवार बंद. २६ नंबर दालनात रत्नजडित वस्तू आहेत. खाली एक पुतळा आणि टोले देणारे घड्याळ बाराचे टोले पाहा. नंतर चार मिनारवरून चुडि बजारात खरेदी. ३) शहराच्या पश्चिमेस अकरा किमिवर गोलकोंडा फोर्ट आणि कुतुब टुम आहे. इकडे उन फार लागते. सकाळी लवकर जा. कमानीकमानी आणि भिंती. गेटपाशी टाळी वाजवून वर ऐकू येते म्हणतात ते आता गोंगाटात शक्य वाटत नाही. वरून हैदराबाद शहर दिसणार नाही खूप अंतर आहे.

बिर्ला मंदिरात जाताना मेन गेटच्या बाहेरच चपला, बुट काढायला लावतात. वर चढुन जायला संगमरवरी पायर्‍या आहेत, ज्या उन्हात बेक्कार तापतात आणि पायाला चटके बसतात. बिर्ला मंदिरात एक तर सकाळी उन्हे चढायच्या आधी नाहीतर संध्याकाळी उन्हे उतरल्यावर जा. संध्याकाळीच गेलेले चांगले कारण तिथून हुसेनसागर आणि दिवेलागणीच्या वेळेचा नेकलेस रोड छान दिसतो. अगदी मुंबईच्या राणीहारासारखा नाही, पण ठीक ठाक दिसतो. :) सालारजंग म्युझियममध्ये दुपारी बाराला टोले पाहायला गर्दी असते, तेव्हा जरा आधीच जा.

आम्ही ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी शताब्दीने निघून हैद्राबादला दुपारी पोचलो. आमचं बुकिंग ताज बंजारा हिल्स ला होता. तिथे चेकइन केलं. दुचाकी कुठे मिळेल हे आधीच गुगलून ठेवलं होता. तिथे जाऊन दुचाकी घेतली आणि गोळकोंड्याला गेलो. (आपल्या पुस्तकांमध्ये गोवळकोंडा असे का लिहितात बरें ?) तिथे उन्हं उतरता उतरता गेलो आणि दिवस वातावरण ढगाळच होता. हा किल्ला फिरून मग कुतुब शाही कबरी लांबूनच बघून लुम्बिनी पार्कला गेलो. गटाराचे पाणी सोडल्यामुळे हुसेन सागर दुर्गंधित झालेला असून सुद्धा क्रूझ ने फेरी मारण्यात उत्सुक होती याचे आश्चर्य वाटले. तिथे थोडावेळ शांत बसून हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी भरपेट नाश्ता करून बाहेर पडलो आणि गेलो ते थेट सालारजंग म्युझिअम ला.. तिथे सर्व दालने फिरून आणि ते १२ चे घड्याळाचे ठोके पाहून नेहरू झू ला गेलो. तिथे सायकल घेऊन झूल फेरफटका मारला. एव्हाना ४.३० वाजत आले. मग चारमिनार ला गेलो जात जाता chawmalha पॅलेस बंद झाल्याचे कळले. मग चारमिनार च्या इथे शॉपिंग करून सुलतानबझारला डोकावून हॉटेलवर गेलो. चारमिनार ला निमराह कॅफे मध्ये इराणी चाई घेतला. उत्तम चव! शिवाय कराची बिस्किटांची खरेदीही वाटेत झाली. तिसऱ्यादिवशीची सकाळ हॉटेल वर विश्रांती घेऊन घालवली आणि दुपारच्या शताब्दीने पुण्याला परत. अशा तऱ्हेने दोन दिवसाची हैद्रबाद ट्रिप सुफळ संपूर्ण(सम्प्रूण )! :D

In reply to by हर्मायनी

सालारजंगची veiled रिबेका पाहिलीत का? प्रचंड सुंदर आणि अप्रतिम संगमरवरी मूर्ती. चटणीज ला साऊथ इंडियन थाळी आणि बावर्चि, पॅराडाइझ बिर्याणीचा आस्वाद घेतला का?