सर्व मिसळपाव रसिकांना नमस्कार !
प्रथमता मी स्वताची ओळख करून देतो. मी मुंबईचा पण नेहमी प्रमाणे मुंबईकर हे आता मुंबईच्या बाहेर राहू शकतात (ठाणे आणि त्या पुढे ).
असाच ऑफिस मध्ये बसल्या बसल्या बेत ठरला. बरेच महिने कुठे बाहेर जाण्याचा योग आला नव्हता. बायकोला फोन करून सांगितला आपण शनिवार रविवार पुण्याला जातोय, थोडी आश्चर्य चकितच झाली की अचानक काय मनात आल?
बायकोची चुलत बहीण राहते पुण्यातल्या नवी पेठेत म्हटलं त्यांना पण भेटता येइल.
नेहमी प्रमाणे माझ्या ऑफिसच्या बॅचमेट्सना whatsapp वर message केला,"शनिवार-रविवार पुणे" कुणी येणार का? २-३ मित्र मैत्रिणी म्हणाले चालेल पण प्लान काय आहे? त्यांना म्हटलं आम्ही मी आणि बायको शनिवारी सकाळी निघतोय,तुम्ही ऑफिस नंतर वाशी वरून बस पकडा किंवा श्रीकांत ची कार आहे. ऐनवेळी गडबड झाली श्रीकांत ने गाडी service centre ला दिलेली आणि बरंच काम निघाल.
शेवटी शुक्रवारी सगळे म्हणाले बस ने जाऊयात पण कुणालाच माहित नव्हते कोण कोण येणार आहे?
शनिवारी सकाळी ठरल्या प्रमाणे मी आणि माझी बायको पुण्यासाठी निघालो.पनवेल डेपो मधून आपला सरकारी लाल डब्बा मिळाला अर्थात ST महामंडळ पकडली. शिवाजीनगरला उतरा अस मेहुणीने सांगितलेलं.
सकाळी १० च्या आसपास आम्ही शिवाजीनगर ला पोहोचलो.
बायकोच अधून मधून येणं जाणं होतं पुण्यात; ती म्हणाली मला माहीत आहे कस जायचं.
रिक्षावाल्यांना विचारल 'नवी पेठेत जायला किती घेणार?' एक जण म्हणाला '९० रुपये'. आमच्या पत्नी साहेब म्हणाल्या 'आम्हाला नाही जायचं खूपच पैसे सांगता'. थोडं बाहेर गेल्यावर एक जण म्हणाला, '६० रुपये'. बायको थोडी गोंधळली काय कराव तेवढ्यात हुशार रिक्षावाला म्हणाला 'ताई मीटर ने चला!' मुंबईत मीटरने जायची सवय. बायको खुश झाली, मला रस्ते दाखवू लागली. तेवढ्यात तिला मी म्हटलं 'अजून किती लांब आहे?' ती म्हणाली अजून ५-१० मिनिट, तिला मीटर दाखवला मग तिथे आधीच ५५ रु झालेले. तिने ड्रायवर ला विचारलं, 'मीटर एवढं कसं झालं?' शेवटी मी म्हटलं आता जाऊ देत.
शेवटी नवी पेठेत पोहोचलो आणि ७० रु झाले. स्वतःवरच हसू येत होतं. सासरे खालीच भेटले, ते म्हणाले ४० रु जास्त होतात. मी म्हटलं जाऊ त्यात आता पुढच्या वेळी लक्ष ठेवू. गम्मत म्हणजे आम्ही दोघे बस मध्ये असताना GPS ने किती अंतर राहील ते पडताळत होतो पण बसमधून उतरल्यावर नवी पेठ किती दूर आहे हे आम्ही पाहीलच नाही !
मेहुणीच्या कुटुंबाशी ओळख वैगरे झाली गप्पा मारल्या.
मेहुणी मार्केट मध्ये निघालेली तिने म्हटलं चला फिरून येऊ.
चालत मग आम्ही श्रीमंत दगडू शेठ गणपती आणि बाकी सगळ्या मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले.
तुळशीबागेत पण जाण्याचा योग आला, तुळशीबाग मी फक्त मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातच पाहिलेली, मुक्ता बर्वे ला दुकानदाराशी भांडताना.
तिकडे गेल्यावर मनातल्या मनात विचार आला कि बायकोला खरेदी करायचं मनात नको यायला.थोडा स्वार्थी विचार होता पण मला वाटत प्रत्येक नवऱ्याला असा विचार येतच असणार.
मेहुनीने खूपच ट्रेकींग करून घेतली( चालत-चालत पुणे दर्शन), शेवटी परत जाताना पाउस आला म्हणून रिक्षा पडकली आणि घरी आलो.
मस्त श्रीखंडाच जेवण झालं. बायको सारखी विचारात होती आपला plan काय आहे आज दिवसभर आणि उद्या आपण काय करणार आहोत. मी म्हटलं मलाच माहित नाही.
मित्रच group discussion चालू होत whatsapp वर कोण कोण येतंय कुठून निघणार.
श्रीकांत सगळ्यांना जमा करून घेऊन येणार होता पण कोण कोण येणार ते माहित नव्हत.
३च्या आसपास श्रीकांत ला फोन केला त्याने उत्तर नाही दिल, मग सारिका माझी batchmet तिला फोन केला तिने उचलला आणि म्हणाली आम्ही गाडी मध्ये आहोत, श्रीकांत, सारिका आणि विषया.
अखेर श्वासात श्वास आला आणि वाटल आता काहीतरी प्लान होणार.
ते पोहोचू पर्यंत आम्ही तिघे मूवी ला निघालो 'जुरासिक world ३d' मंगला theater मध्ये तिकीट online मिळत होतं, मग तिकडे निघालो.
चित्रपट अप्रतिम होता. मध्ये मध्ये बायको आणि मेहुणी घाबरलेले, पण चित्रपट आवडला त्यांना.
चित्रपट संपला आणि आम्ही ५ च्या आसपास रिक्षा पकडून घरी जाण्यासाठी निघालो.
श्रीकांत ला फोन केला पुन्हा रिसीव नाही केला, सारिका ला केल्यावर कळाल कि ते वाकड ला पोहोचले आणि कर्वे नगर ला श्रीकांत ची मैत्रीण राहते तिकडे श्रीकांत ने विषय आणि सारिका च्या राहण्याची सोय केली आहे.
आणि श्रीकांत त्याच्या मित्राच्या रूमवर राहणार होता.
नवी पेठेत पोहोचताच मेहुनीची प्लेजर होती ती घेतली आणि आम्ही निघालो कर्वे नगरला.
वाटेत कळाल सगळी मंडळी cummins college जवळ भेटणार आहेत.
आम्ही google maps वर navigation चालू ठेवून कर्वे नगर ला पोहोचलो.
सगळी मंडळी भेटली आणि गप्पा रंगल्या, श्रीकांत ची मैत्रीण येणार होती जिच्या कडे सारिका आणि विषया राहणार होत्या. Rudra हॉटेल समोर पराठा आणि sandwich restaurants होते तिथेच बसलो.
कॉलेजला येणारे मुले मुली पण मोठ्या संखेने तेथील पदार्थ चाखत होते.
कुणी पराठे, कुणी sandwich order केली आणि गप्पा रंगल्या तेवढ्यात श्रीकांत ची मैत्रीण आली.
तिला पण सगळ्यांनी काहीतरी ओर्डर करायला सांगितलं तिने कॉल्ड कॉफ्फी ऑर्डर केली.
गप्पांचा मुद्दा एकच आजचा आणि उद्याचा बेत काय.
रात्री hangout आणि रविवारी सिंहगड आणि लवासा ला जायचा प्लान झाला.
६ सीटर XYLO बुक केली.
पराठे आलेले पहिले तर बघतो तर नेहमी restaurant मध्ये जेवढ्या आकाराचा पराठा असतो त्या पेक्षा दुप्पट आकाराचा तो पराठा होता पूर्ण संपवण्या साठी खूप मेहनत घ्यावी लागली.
क्रमशः
वाचने
11746
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्च जालं होय.
डेंजरच लिहिताय कि राव!
"आजूबाजूच्यां" च्या लक्षात
In reply to डेंजरच लिहिताय कि राव! by शब्दबम्बाळ
अहो मग मिपावर "पुणे सफरीने
In reply to "आजूबाजूच्यां" च्या लक्षात by काळा पहाड
आता पुढच्या लेखांची कल्पना मी
In reply to अहो मग मिपावर "पुणे सफरीने by शब्दबम्बाळ
मेहुनीची प्लेजर पार्ट २
In reply to आता पुढच्या लेखांची कल्पना मी by काळा पहाड
लौल ! ! ! ! ! ! !
In reply to आता पुढच्या लेखांची कल्पना मी by काळा पहाड
खी खी खी …
In reply to आता पुढच्या लेखांची कल्पना मी by काळा पहाड
अनुभवच तसा आहे !
फोटो टाकण्यासाठी माहिती येथे
In reply to अनुभवच तसा आहे ! by वाचन प्रेमी
धन्यवाद !
In reply to फोटो टाकण्यासाठी माहिती येथे by शब्दबम्बाळ
मुपि-मुपि म्हणतात ते हेच्च कै
नक्की काय?
In reply to मुपि-मुपि म्हणतात ते हेच्च कै by टवाळ कार्टा
पूर्वीच मुपी राहील नाही आता!
In reply to मुपि-मुपि म्हणतात ते हेच्च कै by टवाळ कार्टा
काय भयंकर अनुभव तो. माझी
प्रतिसाद
In reply to काय भयंकर अनुभव तो. माझी by काळा पहाड
निबंध - मी सुटी कशी घालवली
असाच काही समजा
In reply to निबंध - मी सुटी कशी घालवली by सुनील
विकास सर, काय हे !! सांगा जरा
In reply to असाच काही समजा by वाचन प्रेमी
ऑ, अच्च बोल्ले, वाचन पेमी
ठीक आहे. काही प्रतिसादांनी
धन्यवाद
In reply to ठीक आहे. काही प्रतिसादांनी by एस
उत्साहाने लिहिताय!लिहीत रहा
धन्यवाद
In reply to उत्साहाने लिहिताय!लिहीत रहा by अजया
डेरिंगबाज !
bhakarvadi
In reply to डेरिंगबाज ! by अनिरुद्ध.वैद्य
झकास!
In reply to bhakarvadi by वाचन प्रेमी
भाकर नाही ओ बाकरवडी. ब
In reply to bhakarvadi by वाचन प्रेमी
भावना समझा !
In reply to भाकर नाही ओ बाकरवडी. ब by प्यारे१
नाही हो ते ठाणेकर आहेत.
In reply to भावना समझा ! by वाचन प्रेमी
बायको म्हणाली म्हणून
In reply to नाही हो ते ठाणेकर आहेत. by प्रमोद देर्देकर
मी ठाणेकर नाही. धन्यवाद.
In reply to नाही हो ते ठाणेकर आहेत. by प्रमोद देर्देकर
समझा नाही समजा. ज ज जाऊ दे...
In reply to भावना समझा ! by वाचन प्रेमी
श्रीखंड कसं किलो म्हणे?
मी विकत घेतले नव्हते
In reply to श्रीखंड कसं किलो म्हणे? by यसवायजी
हाय राम
In reply to श्रीखंड कसं किलो म्हणे? by यसवायजी
तसं विचारायची पद्धत असते
In reply to हाय राम by अनिरुद्ध.वैद्य
वाचकांनीही आपले पहिले वहिले
कल्पना चांगली आहे
In reply to वाचकांनीही आपले पहिले वहिले by कंजूस
पहिले वहिले अनुभव
In reply to वाचकांनीही आपले पहिले वहिले by कंजूस
आजारी वरणात पडला प्लेन
प्रा. बारटक्के?
In reply to आजारी वरणात पडला प्लेन by अत्रुप्त आत्मा
मुंबईकर हे आता मुंबईच्या
ओ मृत्युन्जय साहेब ज्यांची
In reply to मुंबईकर हे आता मुंबईच्या by मृत्युन्जय
तुळशीबाग मी फक्त मुंबई-पुणे
ते (तथाकथित) मुंबैकर असल्याने
In reply to तुळशीबाग मी फक्त मुंबई-पुणे by खेडूत
मुंबई वरून पुण्याला आले
जवळच्या गोष्टीच राहतात
In reply to मुंबई वरून पुण्याला आले by चिनार
पन्नास !
In reply to जवळच्या गोष्टीच राहतात by वाचन प्रेमी
असं टक्या सांगतो...
In reply to मुंबई वरून पुण्याला आले by चिनार
वा वा वा
अभिनंदन! पदार्पणातच अर्धशतक!
आपली कृपा !
In reply to अभिनंदन! पदार्पणातच अर्धशतक! by शब्दबम्बाळ
ती पानपत ची लढाई पुण्यात
विडंबकांच्या प्रतीक्षेत! ;-)
जेटमाऊली, अगो हेच विडंबन आहे.
In reply to विडंबकांच्या प्रतीक्षेत! ;-) by कवितानागेश
बरं झालं
अगदी अगदी! :-D
In reply to बरं झालं by तिमा
हा जीमोंचा डूआयडी नसेल
In reply to बरं झालं by तिमा
नसावा. हे शुद्ध लिहितायत.
In reply to हा जीमोंचा डूआयडी नसेल by डॉ सुहास म्हात्रे
कधी भाडं मिळतं शवारगेटचं
भाग १
तुम्ही टेंशन नका घेऊ हो लिहित
वाचकांची पडताळणी होती
In reply to तुम्ही टेंशन नका घेऊ हो लिहित by कैलासवासी सोन्याबापु