यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर: पिंपरी दुमाला
असंच कधीतरी, कुठूनतरी पुणे-नगर रस्त्यावर रांजणगावच्या आसपास पिंपरी दुमाला येथे एक शिल्पसमृद्ध यादवकालीन मंदिर आहे ह्याची माहिती मिळाली होती. नक्की ठिकाण कुठे ते माहित नव्हते. मग काय निघालो शोधत आम्ही.
पेरणे फाटा ओलांडल्यावर दोन तीन ठिकाणी विचारतच जावे लागले. एका ठिकाणी डावीकडचा रस्ता पिंपरी दुमाला येथे जातो अशी माहिती मिळाली. तिथून घुसलो. चांगला डांबरी रस्ता थोड्याच वेळात कच्च्या खडबडीत रस्त्यात रूपांतरीत झाला. मग अतिशय लहानलहान वाड्या लागू लागल्या. ठिकठिकाणी विचारत खराब रस्त्याने एकदाचे पिंपरी दुमाला येथे जाऊन पोहोचलो.
गाव तसं लहान. मंदिर गावात शिरल्याशिरल्यानंतर थोडं पुढं आहे. सोमेश्चर मंदिर हे आजचं नाव. पूर्वीचं काय ते नक्की माहित नाही. मूळात मूळचं मंदिर शिवाचंच होतं की काय अशी शंका मंदिर नीट पाहिल्यावर मनात उभी राहते. गावकर्यांनी मंदिराला छानसं कुंपण घातलंय. मंदिर नीटनेटकं ठेवलंय. पण मूळच्या मंदिरावर रंगरंगोटीचे दुर्दैवी अविष्कार ह्या मंदिराच्याही वाट्याला आलेत.
पूर्वी हे भूमिज शैलीत बांधलेले मंदिर असावे. आज शिखराचा भाग आधुनिक आहे. तर मंदिराच्या अंगाचा भाग १००/२०० वर्षांपूर्वी भग्नावस्थेतून जीर्णोद्धारीत केलेला आहे. सभामंडपाचा भाग जीर्णोद्धारीत दिसत असून गाभार्याच्या बाह्य भाग हा मूळाच्याच शैलीत दिसतो. ह्या जीर्णोद्धारात मूळाच्या अनेक मूर्तींची जागा बदललेली येथे स्पष्टपणे दिसते. इतकेच नव्हे तर आवारात असलेले वीरगळही भिंतींमध्ये आधाराचे दगड म्हणून लावल्याचे येथे आढळते. मंदिराच्याच शेजारी खोलवर बांधून काढलेली एक अतिशय देखणी पुष्करिणी आहे.
पिंपरी दुमाला सोमेश्वर मंदिर
मंदिराच्या पुढ्यात नंदीमंडप आहे तर आवारात एका बाजूला यज्ञवराह आणि मत्स्याची मूर्ती आहे. यज्ञवराह म्हणाजे विष्णूचा तिसरा अवतार-वराहवतार. हा जेव्हा वराहाच्या पूर्ण रूपात दाखवला जातो तेव्हा तो यज्ञवराह म्हणवला जातो तर जेव्हा शिर वराहाचे आणि धड विष्णूचे अशी मूर्ती असेल तेव्हा तो नरवराह म्हणू ओळखला जातो. यज्ञवराहाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावर विष्णूच्या लहानलहान असंख्य मूर्ती कोरलेल्या असतात तर सुळ्यांवर पृथ्वी धारण केलेली असते आणि पायातळी नाग असतो जे पाताळाचे प्रतिक मानले जाते. पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी यज्ञवराहाच्या मूर्ती आहेत- लोणी भापकर, पिंपरी दुमाला आणि चाकणचे चक्रेश्वर मंदिर.
इथली यज्ञवराहाची मूर्ती अत्यंत भग्न झालेली आहे. त्याच्याच बाजूला मत्स्याची मूर्ती आहे. सुरुवातीला ही मूर्ती पाहून ही कासवाची असावी असे वाटून माझी गफलत झाली होती. पण नीट पाहता हीचे तोंड मत्स्याशी जास्त मिळतेजुळते आहे. हा विष्णूचा पहिला अवतार मत्स्यावतार.
यज्ञवराह
मत्स्यावतार
मत्स्य आणि वराह
मंदिराच्या पुढ्यातला नंदीमंडप
चला तर आता मंदिराच्या बाह्यांगाचा एक फेरफटका मारूयात. पण तत्पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी लावून ठेवलेली एक विष्णूमूर्ती बघूयात.
ही इथली सर्वात देखणी मूर्ती. कित्येक शतकांच्या उनपावसाच्या मार्याने आज ही बर्यापैकी झिजली आहे. समभंग मुद्रेत ही मूर्ती असून शंख, चक्र, गदा ही आयुधे स्पष्ट दिसत आहेत तर पायापाशी गरुड विष्णूला प्रणाम करीत आहे. बाजूला इतर काही अनुयायी दिसत आहेत. नक्षीदार प्रभावळीत मस्तकाच्या वर गणेशमूर्ती कोरलेली असून डावी उजवीकडे बहुधा ब्रह्मा आणि महेश आहेत. ही मूर्ती सोडून मंदिराच्या आवारात इतरही असंख्य भग्न विष्णूमूर्ती आहेत.
विष्णूमूर्ती
चला तर आता मंदिराच्या बाह्यांगाचा एक फेरफटका मारूयात.
मंदिरांच्या बाह्यभागावर सुरसुंदरी, वादक, ऋषी, भैरव, चामुंडा, विष्णू, गणेश, महावीर तसेच काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीही येथे आहेत. इथल्या मूर्ती तशा देखण्या नाहीत. बहुधा १३/१४ व्या शतकात यादव राजवट संपता संपता हे मंदिर बांधले गेले असावे. साहजिकच मूळच्या शैलीतली वैशिट्ये कायम राहूनही देखणेपणाचा मात्र येथे लोप झालेला दिसतो.
बाह्यभिंतींवरील सुरसुंदरी.
सुरसुंदरींच्या मध्ये मधेच वीरगळ चिणलेले दिसतात.
येथे काही मैथुनशिल्पे सुद्धा आहेत.
इथल्या एका भिंतीवर खूप आगळीवेगळी शिल्पे आहेत. कावड घेतलेला पुरुष, मोठे वृषण असलेला पुरुष, बाळाला जन्म देत असलेली स्त्री.
आगळीवेगळी शिल्पपट्टीका
बाळाला जन्म देणार्या स्त्रीची प्रतिमा मी लोणी भापकर येथील मंदिरावर पण पाहिलेली आहे. अशा शिल्पांचा उद्देश काय असेल ते कळात नाहीत पण बहुधा सृजनाचे प्रतिक म्हणून अशी शिल्पे कोरली जात असावी.
पिंपरी दुमाला येथील जन्मदात्र्या आईची प्रतिमा
भिंतीत चिणलेले वीरगळ येथे ठायी ठायी दिसत राहतात. इथल्या वीरगळाअंचे वैशिष्ट्य म्हणाजे हे वीरगळ त्रिस्तरीय आहेत. सहसा वीरगळ ४ स्तरांचे असतात. सर्वात वरचा थर शिवपिंड व नमस्कार करणारा वीर, दुसरा थर वीराला अप्सरा कैलासास घेऊन जाताना. तिसरा लढाईचा थर तर चौथा धारातीर्थी पडलेला वीर. येथे मात्र अप्सरांच्या थराचा अभाव दिसतो.
शिल्पपट्टीकेच्या शेजारीच ऋषी, जैन साधक अशा काही प्रतिमा आहेत.
सभामंडपाचा भाग संपवऊन आपण आता गर्भगृहाच्या बाह्यभागाशी येतो. येथे मंदिराचा मूळाचा भाग कायम राहिलेला दिसतो. इथल्या भिंतीवर जागोजागी विविध मूर्ती आहेत. इथल्या कोष्ठांमध्ये तसेच त्यांछ्या आजूबाजूला देखील मूर्ती कोरलेल्या दिसतात.
तप करणारा ऋषी
ऋषी, गोमटेश्वर, अनुयायी आणि गणेश
इथल्या देवकोष्ठात भैरवाची मूर्टी देखील आहे. हाती कपाल आणि खट्वांग, डमरू आणि त्रिशूळ, गळ्यात नरमुंड आणि संपूर्ण नग्न अशी ही भैरवाची प्रतिमा
भैरव
भैरवाच्याच जोडीला येथे नंदीवर बसलेल्या शिवाची मूर्ती देखील आहे.
शिव
मंदिराचा पार्श्वभाग
इथल्या भिंतींवर मातृशक्तीचे प्रतिक असलेल्या काही मूर्ती आहेत.( मातृका नव्हेत) पैकी एकीच्या एका हाती आंब्याचा घोस तर दुसरे हाती बीजापूरक धारण केलेले दिसते. तिच्याच बाजूला दर्पणसुंदरी आहे. तर दोघींच्या मध्ये एका सुंदरीने हाती नाग पकडलेला आहे.
बीजापूरक धारण केलेली स्त्री आणि दर्पणसुंदरी
त्याच्याच जवळपास विषकन्येची एक मूर्ती आहे. विषकन्येसोबतच असितांग भैरव आणि सुरसुंदरी आहेत.
विषकन्या जवळून
सुरसुंदॠ अभिसारिका प्रियकराला भेटायला नटूनथटून चालली आहे तर तिला एक मर्कट त्रास देते आहे. ती त्या मर्कटला एक थप्पड देते आहे. तिच्याच शेजारी डावीकडे एक घंटानाद करणारी पुरुषमूर्ती आहे.
सुरसुंदरी अभिसारिका
चामुंडेची एक अतिशय देखणी मूर्ती येथे आहे. अस्थिपंजर शरीर, खोबणीतून बाहेर आलेले डोळे, विचकलेल्या दाढा, लांबट स्तन, गळ्यात विंचू आणि नरमुंडमाला, हाती डमरू अआणि त्रिशुळावर नरमुंड आणि पायातळी प्रेत ही चामुंडेची वैशिष्ट्ये येथेही आहेत. ही चामुंडा ओठांमध्ये बोट ठेऊन शीळ घालत आहे.
चामुंडा
चामुंडेच्या शेजारी वेताळगण आणि सुरसुंदरी पुत्रवल्लभा आहे. पुत्रवल्लभा म्हणजे कडेवर लहान बाळ घेतलेली स्त्री.
सुरसुंदरी पुत्रवल्लभा
ह्या मूर्तीशेजारीच नटराज शिव आहे.
मंदिराचे बाह्यांग
एके ठिकाणी भिंतीत कठोर तप करणारा ऋषी आणि नागप्रतिमा आहे.
परत येथे जैन साधक किंवा महावीर आणि नागप्रतिमा दिसते.
सुरसुंदरी आणि वादक
मंदिरांच्या बाह्यांगाचा फेरफटका मारून आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस प्रतिहारी तसेच सेवक कोरलेले आहेत. सभामंडप नक्षीदार स्तंभांवर कोरलेला असून स्तंभांच्या जंघ्यांवर विविध प्रकारची शिल्पे, किर्तीमुखे आणि नक्षी इत्यादी कोरलेली आहेत.
प्रवेशद्वारावरील प्रतिहारी
सभामंडप
स्तंभांवरील काही शिल्पे -वाली आणि सुग्रीव
तीन पुरुष आणि चार पाय असलेले आभासी शिल्प
वादक
पुन्हा एकदा चामुंडा
गर्भगृहाचे दारावर देखील प्रतिहारी कोरलेले असून मंदिरातील सर्वात देखणे स्तंभ तेथेच आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
सोमेश्वर महादेव
गाभार्यातून बाहेर पडून पुष्करिणीपाशी गेलो. अतिशय देखणी पुष्कर्णी आहे ही. पूर्णपणे बांधीव. खोलवर उतरत गेलेली.
येथून अगदी जवळच दुसरे एक लहानसे मंदिर आणि तेथेच एक भव्य पुष्करिणी आहे. ती मात्र आवर्जून पाहालायच हवी. रामेश्वराचे ते मंदिर.
रामेश्वर मंदिर
रामेश्वर पाहिल्यावर तिथून निघालो तर रांजणगाव ७ किमी अशी पाटी दिसली. अतिशय चांगला रस्ता. ह्या रस्त्याने रांजणगावच गणपती, मंदिराचे आवारातील सतीशिळा आणि वीरगळ पाहून घरी परतलो.
काही टिपलेले क्षण

वाचने
20610
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
हा पिंपरी दुमालाचा लेख
In reply to हा पिंपरी दुमालाचा लेख by कंजूस
हा वल्लींचाच आयडी आहे बहुधा.
In reply to हा पिंपरी दुमालाचा लेख by कंजूस
जाण्यासाठी दौंड स्टेशन सोयिस्कर पडेल का?
In reply to जाण्यासाठी दौंड स्टेशन सोयिस्कर पडेल का? by मुक्त विहारि
पुण्याहूनही अर्ध्या दिवसात
In reply to पुण्याहूनही अर्ध्या दिवसात by प्रचेतस
पुण्याहूनही अर्ध्या दिवसात अगदी सहज पाहून होतं.....
In reply to पुण्याहूनही अर्ध्या दिवसात अगदी सहज पाहून होतं..... by मुक्त विहारि
एका दिवसात करता येतील पण
In reply to हा पिंपरी दुमालाचा लेख by कंजूस
हो.
शिल्पे भारी आहेत. ते ३ लोक
मस्त लेख.....
सर्व फोटो पाहिले.शेवटून तिसरा
सहिच रे, चंडिकेचे शिल्प लय
In reply to सहिच रे, चंडिकेचे शिल्प लय by स्पा
+१
In reply to +१ by स्वच्छंदी_मनोज
वल्लींनी नविन नांव घेतले तरी, लेखन-शैली तशीच आहे.
In reply to +१ by स्वच्छंदी_मनोज
@ पुर्वीचे वल्लीच जास्त
In reply to @ पुर्वीचे वल्लीच जास्त by अत्रुप्त आत्मा
लेणी,शिल्पकला इत्यादीसाठी
In reply to लेणी,शिल्पकला इत्यादीसाठी by कंजूस
वल्लीच
In reply to लेणी,शिल्पकला इत्यादीसाठी by कंजूस
गजेंद्रपावकवल्ली - हे ही
मस्त लेख आणि फोटो.
वीरगळामध्ये असलेले चार थर
In reply to वीरगळामध्ये असलेले चार थर by आदूबाळ
नाही नाही.
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आणि
लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण
In reply to लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण by अजया
यादवांचे काही महाल जैन
लेख आवडला
माहितीपूर्ण
In reply to माहितीपूर्ण by पैसा
बाळाला जन्म देणारी स्त्री
In reply to बाळाला जन्म देणारी स्त्री by प्रचेतस
लज्जागौरी वाच प्लीज
In reply to लज्जागौरी वाच प्लीज by पैसा
हे पुस्तक आता वाचलेच पाहिजे.
यज्ञवराहाची अवस्था बघून वाईट
रच्याकने, त्या
In reply to रच्याकने, त्या by सूड
ते माशाचे पर आणि शेपूट
In reply to ते माशाचे पर आणि शेपूट by प्रचेतस
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.
In reply to नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. by एस
असेच म्हणतो. कासवाचे कवच
In reply to असेच म्हणतो. कासवाचे कवच by बॅटमॅन
तसा मत्स्यावतार मी अन्यत्र
In reply to तसा मत्स्यावतार मी अन्यत्र by प्रचेतस
मत्स्य नसून कूर्म असेलही पण
In reply to तसा मत्स्यावतार मी अन्यत्र by प्रचेतस
धन्यवाद.
नेहमीप्रमाणे मस्त
मंदिर सुंदर आहे. चांगली
लै भारी..
एका विस्मृतित गेलेल्या
खास वल्ली-ष्टैलचा प्रचेतस
In reply to खास वल्ली-ष्टैलचा प्रचेतस by डॉ सुहास म्हात्रे
@ माहित नाही कुठून कुठून लेणी
चांगली माहीती
In reply to चांगली माहीती by नाखु
मोराच्या चिंचोलीजवळच आहे पण
लेख खूप आवडला. या निमित्ताने
In reply to लेख खूप आवडला. या निमित्ताने by बॅटमॅन
संध्याकाळी काही टंकतो
In reply to संध्याकाळी काही टंकतो by प्रचेतस
धन्यवाद, लिष्टीचा इंतजार आहे.
In reply to धन्यवाद, लिष्टीचा इंतजार आहे. by बॅटमॅन
पुण्यातील काही.
In reply to पुण्यातील काही. by प्रचेतस
अतिशय धन्यवाद.
In reply to अतिशय धन्यवाद. by बॅटमॅन
पूरचा कुकडेश्वर म्हणजे चावंड
In reply to पूरचा कुकडेश्वर म्हणजे चावंड by प्रचेतस
अच्छा, धन्यवाद 'प्र'ल्ली आणि
In reply to अतिशय धन्यवाद. by बॅटमॅन
जुन्नर -पुरफाटा-चावंडफाटा
In reply to जुन्नर -पुरफाटा-चावंडफाटा by कंजूस
correct..
In reply to पुण्यातील काही. by प्रचेतस
एक शंका आणी एक प्रश्ण
In reply to एक शंका आणी एक प्रश्ण by स्वच्छंदी_मनोज
नागेश्वर साधारण
In reply to नागेश्वर साधारण by प्रचेतस
जबरी माहीती
भारी आहे लेख. :)
+१११
अरे वा..
लास्टच्या फोटोत धन्या एकदम
खूप छान फोटो आणि माहीती.
In reply to खूप छान फोटो आणि माहीती. by खटपट्या
केवळ रामेश्वरच असं नाही पण
शंका..
In reply to शंका.. by योगेश आलेकरी
चंड म्हणजे क्रुद्ध.
बेलूर व हळेबिडू
In reply to बेलूर व हळेबिडू by एक सामान्य मानव
मूर्तींमध्ये साम्य तसे कमी.
सुरेख लेख! मंदिरांकडे असे कधी
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण
उत्तम लेख. फोटो ही आवडले.